गांधीनगर: गुजरातच्या तापीमध्ये अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. कुटुंबीय लग्नाला परवानगी देत नसल्यानं प्रेमी युगुलानं जीवन संपवलं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे पुतळे तयार करून वरात काढली आणि सप्तपदी पूर्ण करून त्याचं लग्न लावून दिलं. कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी पुतळ्यांच्या साथीनं लग्नातील सर्व विधीही पूर्ण केले.

नेवाला गावात वास्तव्यास असलेल्या गणेश आणि रंजनाचे प्रेमसंबंध होते. त्यांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. ऑगस्ट २०२२ मध्ये गणेश रंजनाला पत्नी म्हणून घरी घेऊन गेला. मात्र कुटुंबानं त्यांचं नातं स्वीकारलं नाही. दोघांनाही कुटुंबानं घरातून हाकलवलं. काही वेळातच दोघांनी जीवनयात्रा संपवली. दोघांचे मृतदेह एकाच झाडावर लटकलेल्या अवस्थेत दिसले.
तुझी का माझी? बॉयफ्रेंड, एक्स बॉयफ्रेंड एकत्रच घरी; दोघांना पाहताच तरुणीची विहिरीत उडी अन्…
गणेश आणि रंजना यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. दोघांनी कुटुंबीयांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ऐकलं नाही. दोन्ही कुटुंबाचा या नात्याला विरोध केला. त्यामुळे गणेश आणि रंजनानं एकत्रच जगाचा निरोप घेतला. यानंतर कुटुंबीयांचे डोळे उघडले. दोघांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी त्यांनी दोघांचं लग्न लावलं.
स्वत:ला संपवण्याचा कट, कार पेटवली, बॉडी सापडली; एका बाटलीनं केस फिरली; कारण ठरले 6 कोटी
दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन दोघांचे पुतळे तयार केले. आदिवासी परंपरेनुसार दोघांचं लग्न लावण्यात आलं. ‘गणेश आमच्या लांबच्या नात्यातला होता. त्यामुळे आम्ही लग्नाला विरोध केला. मात्र आता दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पुतळे करून त्यांचं लग्न लावलं आहे,’ असं रंजनाचे आजोबा भीमसिंह पडवी यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here