GMC Nagpur News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) (मेडिकल) मेडिसीन आणि सर्जरी या दोन्ही विभागांचा संयोग असलेला एमर्जन्सी कॉरिडॉर अर्थात मेडिसीन एमर्जन्सी विभाग तयार करण्यात येत आहे. येथे दोन्ही विभागांचे वरिष्ठ डॉक्टर एकत्र हजर असतील. यामुळे अत्यवस्थ रुग्णांवरही तातडीने उपचार होऊन, प्राण वाचविले जाऊ शकतील.

मेडिकलमध्ये मेडिसीन अर्थात औषध वैद्यकशास्त्र विभागाचा आपत्कालीन विभाग आहे. सर्जरी विभागासाठी स्वतंत्र कॅजुअल्टी आहे. ट्रॉमा सेंटरही आहे. रात्रीअपरात्री अपघातग्रस्तांना ट्रॉमात आणले जाते. काहींना मेडिसीन विभागाच्या कॅज्युअल्टीतही आणले जाते. परंतु, रात्रीच्यावेळी येथे डॉक्‍टरांची संख्या तोकडी असल्याची नेहमीचीच तक्रार असते. त्यावर उपाय म्हणून मेडिकलमध्ये सर्जरी आणि मेडिसीन अशा दोन्ही विभागाच्या कॅज्युअल्टीचा एक वेगळा इमर्जन्सी कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे. हा विभाग मेडिसीन इमर्जन्सी विभाग नावाने ओळखला जाईल. येथे येणाऱ्या गंभीर रुग्णांवर एकाचवेळी उपचार सुरू केले जातील. यामुळे अनेकांचे प्राण वाचविणे शक्य होऊ शकणार आहे.

रेड आणि ग्रीन झोन

मेडिसीन विभागाची गरज असणाऱ्या रुग्णांना मेडिसीन कॅज्युअल्टीत तात्काळ उपचार मिळावे या हेतूने मेडिसीन इमर्जन्सी विभाग (कॉरिडॉर) तयार करण्यात येत आहे. येथे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी सेवा देतील. रुग्ण उपचारासाठी येताच त्यांची स्थिती गंभीर असल्यास त्याला रेड झोन तर परिस्थिती आटोक्यात असलेल्या रुग्णाला ग्रीन झोनमध्ये ठेवण्यात येईल. हे दोन्ही झोन एमर्जन्सी कॉरिडॉरमध्ये असतील. 

news reels New Reels

अतिदक्षता विभागात सहा बेड

एमर्जन्सी मेडिसीन कॉरिडॉरमध्ये निकषानुसार प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांना इनचार्ज ठेवण्याचा राष्ट्रीय वैद्यक आयोगाचा निकष आहेत. यानुसार रात्रकालीन सेवेत वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी डॉक्टरांना तैनात ठेवण्यात येईल. गंभीर रुग्णांना थेट मेडिकलच्या मेडिसीन इमर्जन्सी विभागात दाखल करण्यात येईल. सहा खाटांची व्यवस्था असलेला हा विभाग लवकरच तयार होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

अधिकाधिक प्राण वाचविणे शक्य होईल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेडिसीन इमर्जन्सी कॉरिडॉर अर्थात इमर्जन्सी विभाग तयार झाल्यानंतर या विभागात रुग्णांना तत्काळ उपचार मिळतील. रुग्णांचे ग्रीन तसेच रेड असे वर्गीकरण करून रुग्णांवर उपचाराचा प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल. गंभीर रुग्णाला तत्काळ उपचार मिळतील. त्यामुळे अधिकाधिक प्राण वाचविणे शक्य होऊ शकेल, असा विश्वास अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी व्यक्त केला आहे.

ही बातमी देखील वाचा…

नागपूरचे रस्ते होणार ‘वॉकर फ्रेन्डली’; नेमकी काय आहे ही योजना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here