Mumbai Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबई दौऱ्यात 40 हजार कोटी किंमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. यासोबतच त्यांनी मुंबई मेट्रो रेल्वे लाईन 2A आणि 7 याचे देखील उद्घाटन केले आहे. यादरम्यान त्यांनी मेट्रोमध्ये प्रवास करण्याचा आनंद देखील लुटला. या दोन मेट्रो लाईन बनवण्यासाठी सुमारे 12,600 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. आता या दोन्ही मेट्रो लाईन शुक्रवारपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहेत.   

Mumbai Metro: किती असेल तिकीट? 

मेट्रोच्या या 35 किमी मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे 60 रुपये खर्च करावे लागणार आहेत. मेट्रो 7 च्या 16.5 किमी मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे 30 रुपये खर्च करावे लागतील, तर मेट्रो-2A च्या 18.6 किमी मार्गासाठी कमाल भाडे 30 रुपये असेल. हे दोन्ही मेट्रो कॉरिडॉर घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मेट्रो-3 कॉरिडॉरलाही जोडण्यात आले आहेत.

Mumbai Metro: तासांचा प्रवास काही मिनिटांत होणार पूर्ण 

मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे.  या सुविधेमुळे प्रवाशांचा तासांचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होणार आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ज्या मार्गावर ही मेट्रो उभारण्यात आली आहे तो मार्ग सर्वात वर्दळीचा आहे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा हा मार्ग आहे. या मुख्य महामार्गावर मेट्रोच्या उभारणीमुळे अंधेरी ते दहिसर दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. साधारणपणे सकाळी दहिसरहून मुंबईला येताना 30 मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. तर संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये अडकल्यासही तेवढाच वाया जातो. मात्र आता नवीन मेट्रो लाईन सुरु झाल्याने नागरिकांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे.

news reels New Reels

Mumbai Metro: अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व, किती आहे मेट्रो स्टेशन?

या मार्गावर तुमचा अंधेरी पूर्वेकडील गुंदवली स्टेशन ते दहिसर पूर्व असा प्रवास सुरू होईल. यात पहिले स्थानक गुंदवली, त्यानंतर मोगरा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाड, राष्ट्रीय उद्यान आणि दहिसर पूर्व हे स्थानक असेल.

Mumbai Metro: अंधेरी पश्चिम ते दहिसर पश्चिम

या मार्गावरील तुमचा प्रवास डीएन नगर मेट्रो स्टेशनपासून सुरू होईल. त्यानंतर लोअर ओशिवरा, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वलणई, डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम, मंडपेश्वर आयसी कॉलनी कांदरपाडा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here