20 January Headlines: शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला? या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीची दुसरी फेरी मंगळवारी झाली होती. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूट पडलीच नसल्याचा दावा करत सध्या दाखवण्यात येणारे चित्र कपोलकल्पित असल्याचा दावा केला. शिंदे गटाने दिलेली शपथपत्रे खोटी असून या सर्वांची ओळखपरेड घ्या, तरच सत्यता समोर येईल, असेही आयोगाला सांगितले. शिंदे गटातील 7 जिल्हाप्रमुखांच्या शपथपत्रावरही आक्षेप नोंदवला. यात विजय चौगुले, राजाभाई केणी, चंद्रकांत रघुवंशी, किरसिंग वसावे, नितीन मते यांच्यासह आणखी दोघांचा समावेश आहे. इतर पदांवर कार्यरत असतानाही या नेत्यांना जिल्हाप्रमुखपदी दाखवण्यात आल्याचे सिब्बल यांनी सांगितले.  10 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीत शिंदे गटाचे अॅड. महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपदच बेकायदा आहे. आमच्याकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्याने शिंदेंचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. हा दावा खोडून काढताना अॅड. सिब्बल म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा पक्षच खरी शिवसेना आहे. शिंदे गटाचे आमदार, नेते काही लोकांना बाहेर घेऊन स्वत:हून बाहेर पडले आहेत. ते बेकायदा आहेत. त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम झालेला नाही. यातील काही आमदारांवर अपात्रतेचा खटला सुरू आहे. दरम्यान, आज पुन्हा यावर सुनावणी होणार आहे.

आजपासून मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए चा मार्गावरील मेट्रो सुरु 

आजपासून मेट्रो 7 आणि मेट्रो 2 अ चा मार्गावरील मेट्रो खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. दुपारी 3 नंतर ही मेट्रो सुरु होईल, अशी माहिती मिळाली आहे. मेट्रो 7 चा मार्ग आणि स्थानकं – या मेट्रो मार्गावर 13 स्टेशनवर थांबा असणार आहे. जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा इथे मेट्रो मार्ग थांबेल. मेट्रो 2 ए मार्गावर अंधेरी पश्चिम, ओशिवारा, लोअर ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वनराई, डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम, खंडारपाडा, आनंदनगर, दहिसर पश्चिम, मांडपेश्वर ही स्टेशन आहेत.

शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी पंकजा मुंडे उतरणार 

news reels New Reels

बीड – यावेळी पंकजा मुंडे  संस्थाचालकांशी संवाद साधतील आणि लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची भेट घेतील. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन वेळा मागच्या पंधरा दिवसात बीडला आले मात्र या दोन्ही कार्यक्रमाला ना पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली ना बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मराठवाडा शिक्षक मतदार संघच्या होणाऱ्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी येतात त्यावेळी बावनकुळे यांच्यासोबत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे याही या प्रचार दौऱ्यात असणार आहेत. सकाळी गेवराई मध्ये किरण पाटील यांच्या प्रचारात शिक्षक मेळावा आयोजित केलाय त्यानंतर बीड शहरांमध्ये आणि सायंकाळी अंबाजोगाई मधल्या खोलेश्वर महाविद्यालय इथं शिक्षक मिळावे आयोजित करण्यात आले आहेत. फडणवीसांचा दौरा बीडमध्ये झाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे या बीडमध्ये येत आहेत आणि जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत, त्यामुळे पंकजा मुंडे या प्रचार दौऱ्यात काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ख्रिस्ती समाजाचा शांती महा मूकमोर्चा

सांगली – ख्रिस्ती समाजावर होणारे धर्मांतराचे आरोप, हल्ले, खोट्या केसेस दाखल करणे या विरोधात आणि या सगळ्या गोष्टी थांबवाव्यात यासाठी आज सांगलीत ख्रिस्ती समाजाचा शांती महा मूकमोर्चा निघणार आहे. सकाळी 10 वाजता विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. आरोप करणाऱ्यांवर कारवाई करावी, आटपाडी प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यांची शहानिशा करून गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये समस्त ख्रिस्ती बांधवांनी सहभागी व्हावं, असे आवाहन संविधान बचाव ख्रिस्ती हक्क समितीकडून करण्यात आलं आहे.

ब्रिजभूषण शरणसिंग यांच्याविरोधात आजही पैलवानांच आंदोलन 

दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाविरोधात पैलवानांच आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू होतं. बुधवारी क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांसोबत आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची चर्चा झालीय. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांना हटवलं जात नाही तोपर्यंत जंतरमंतरवर आंदोलन सुरु राहणार असल्यांच पैलवानांनी सांगीतलय. आज पुन्हा सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरवात होणार आहे. हिमाचल प्रदेशचे सर्व कार्यक्रम रद्द करून केंद्रिय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर दिल्लीत पोहचलेत. 

संजय राऊत आज भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

जम्मू –संजय राऊत राहूल गांधी सोबत आज भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज पुणे दौऱ्यावर

पुणे – केंद्रीय मंत्री नारायण राणे आज पुणे दौऱ्यावर असतील. सिम्बॉयसिस महाविद्यालयात जीत केलेल्या रोजगार मेळाव्याला नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पुणे महानगरपालिकेसमोर निदर्शन

पुणे – पुण्यातील रस्त्याची झालेल्या दुरवस्थेतेच्या विरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पुणे महानगरपालिकेसमोर निदर्शन. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील आजी-माजी खासदार आमदार सर्व पदाधिकारी राहणार उपस्थित.

अजित पवार तासगाव तालुक्याच्या दौऱ्यावर 

सांगली – विरोधी पक्ष नेते अजित पवार तासगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असतील. यावेळी अजित पवारांच्या हस्ते मणेराजुरी येथील शेतकरी मेळाव्यात नूतन सरपंच आणि उपसरपंच सत्कार, सावळज येथे बागायतदारांसोबत संवाद, आरवडे येथे अजित पवार यांच्याहस्ते जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ.

ज्योतिरादित्य शिंदे आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेणार 

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप पक्षाचे कार्यक्रम सुरू होतील. 

कोल्हापुरात आजपासून इंडियन डेअरी फेस्टिवल

कोल्हापूर – दूध व्यवसायातील उत्पादन वाढीसाठी कोल्हापुरात आजपासून इंडियन डेअरी फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार असून श्रीमंत शाहू महाराज अजित पवार पृथ्वीराज चव्हाण हजेरी लावणार आहेत.

नागपुरात आज 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे उद्घाटन

नागपुरात आज 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संयुक्तरित्या या तीन दिवसीय संमेलनाचे आयोजन केले आहे. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसमध्ये देशातील नामांकित औषध निर्माता कंपन्यांच्या तज्ञांचे व्याख्यान होणार आहे. सकाळी 10 वाजता 

मुंबई – रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्याने अपाॅईंटमेंट्स देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांना संबोधित करतील. मुंबईतून केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते 25 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here