नाशिक : कुत्रे मागे लागले म्हणून संताप आणि मद्याच्या नशेत मी वाहनाच्या काचा फोडल्या अशी माहिती सातपूर घटनेतील आरोपीने पोलिस तपासात दिली आहे. या आरोपीला गुन्हे शाखा युनीट दोनच्या पथकाने गुरुवारी अटक केली.

रवींद्र श्रीकृष्णा सगरे (रा. एमएचबी कॉलनी, सातपूर) आणि रुबी आलमशाह यांच्या दोन कारसह परिसरातील सात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने सातपूर परिसरात खळबळ उडाली होती. गुन्हे शाखा युनीट दोनने या प्रकरणाचा तपास सुरू केला. जेथे ही तोडफोड झाली तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आकाश निवृत्ती जगताप (वय २१, रा. एम.एच.बी कॉलनी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सोनू कारवाळ, कर्मचारी यशवंत बेंडकोळी, राजेंद्र घुमरे, सुनील आहेर, प्रशांत वालझाडे, संतोष ठाकूर यांनी त्याला अटक केली.

Raigad Accident : पट्टीचा चालक, पण गाडी चालवतानाच घात; गावकऱ्यांसाठी धावणारा निलेश गावी जातानाच मृत्युमुखी

‘…म्हणून वाहनांवर काढला राग’

हा प्रकार घडला तेव्हा आकाश दारूच्या नशेत होता. मागे कुत्रे लागल्याने त्याने कुत्र्याच्या दिशेने दगड भिरकावला. परंतु हा दगड वाहनावर गेल्याने त्या वाहनाची काच फुटली. त्यानंतर दारूच्या नशेत दगडफेक करीत अन्य वाहनांच्याही काचा फोडल्याची माहिती त्याने चौकशी दरम्यान दिली आहे. आकाश जगताप याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती निरीक्षक वाघ यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here