मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे गुरुवारी मुंबईतल्या अंधेरी पूर्व इथे मेट्रोच्या दुसऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. इतकंच नाही तर यावेळी त्यांनी मेट्रोने प्रवासही केला. यावेळी चर्चेचा विषय ठरल्या त्या मेट्रोच्या पायलट तृप्ती शेटे. मुंबई मेट्रो चालवण्यासाठी ९१ पायलट आहेत. त्यातील २१ महिला असून त्यापैकी एक आहे तृप्ती शेटे (Trupti Shete).

पंतप्रधान मोदी हे मेट्रोने प्रवास करणार असल्याचं तिला समजतात तिला खूप आनंद झाला. पंतप्रधानांनी गुरुवारी मेट्रो २A आणि मेट्रो 7 चं उद्घाटन केलं. २७ वर्षीय तृप्ती शेटे यांनी गेल्या वर्षी पेज वन ट्रायल दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही मेट्रोली प्रवास करायला भाग पाडलं. त्यावेळीही मेट्रो त्याच चालवत होत्या.

मुंबई : व्यायाम करताना अचानक चक्कर आली अन्…, जिममध्येच क्षणात संपले आयुष्य
यासंबंधी तृप्ती यांना विचारलं असता पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास केलेली मेट्रो ट्रेन चालवण्याची संधी मला मिळाली, त्यामुळे मला खूप आनंद झाला. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली. ती पुढे म्हणाले की, आज माझे आई-वडील आणि कुटुंबीय खूप आनंदात आहेत आणि त्यांना माझा अभिमान आहे. संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास पीएम पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी पूर्व येथील गुंदवली ते मोगरा स्थानकापर्यंत शेटे यांच्या मेट्रोने प्रवास केला आणि नंतर ते परत आले. यावेळी पंतप्रधानांनी मुंबईतील विद्यार्थी, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मेट्रो कामगारांशी संवाद साधला.

दरम्यान, तृप्ती हिने अभियान अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ३ वर्ष नोकरीसाठी संघर्ष केला. एक महिला असल्याने ही संधी मिळणे तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. विशेषता ९१ पायलटच्या मधोमध स्वतःसाठी जागा बनवणे ही देखील तृप्तीसाठी संघर्षाची बाब होती. पण कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही हे तिने समजलं होतं. तर जे मेहनत करतात त्यांना त्यांचं यश नक्की मिळतं अनुभव तृप्ती शेटे हिनं बोलून दाखवला.

‘हम याद बहुत आएंगे’, रेडिओवर दुखद गाणी ऐकत असताना २२ वर्षीय तरुणीने संपवलं जीवन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here