Nashik Satyjeet Tambe : नाशिकसह (Nashik) इतर जिल्ह्यातील मतदारांनी जस सुधीर तांबे (Sudhir tambe) यांच्यावर जसं तीन वेळा प्रेम आपण सगळ्यांनी केलं. त्या पद्धतीचे प्रेम माझ्यावर करावं असं आपल्या सगळ्यांना विनंती करतो, असं आवाहन अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet tambe) यांनी केले आहे. ते सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत.
संगमनेर तालुक्यातील काही गावांना अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे भेटी देत आहेत. यावेळी त्यांनी स्थानिक मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 20 तारखेला होत आहे. मागचे पंधरा वर्षे या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करण्याचं काम माझे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी अतिशय यशस्वी पद्धतीने केलेला आहे. मागच्या पंधरा वर्षांमध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक या पाचही जिल्ह्यांमध्ये म्हणजे अगदी अहिल्याबाई होळकरांचे जन्मगाव चोंडी पासून ते गुजरातची बॉर्डर असलेल्या धडगाव तालुक्यापर्यंत प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन प्रश्न सोडवले आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, औद्योगिक क्षेत्रातील लोकांचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगार, कृषी शेतकरी, तरुण शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पदवीधरांचे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचं काम डॉ. सुधीर तांबे यांनी अतिशय प्रामाणिकपणे केलं.
सत्यजीत तांबे पुढे म्हणाले कि, डॉ. सुधीर तांबे यांच्या स्वभावातून, वागण्यातून, कामातून त्यांनी या पाच जिल्ह्यांमध्ये माणसं जमवलेली आहेत. ती माणसं आता पक्ष किंवा कुठल्याही विचारधारेच्या पलीकडे जाऊन हे सगळेजण त्यांच्या पाठीशी उभा राहायचं म्हणत आहेत. सुधीर तांबे यांनी आजपर्यंत काम केलेले आहे आणि म्हणूनच त्यांच्या सगळ्या कामाच्या पार्श्वभूमीवर आताही निवडणूकमध्ये रिंगणात उतरलेलो आहे. निश्चित खात्री आहे की त्यांनी जे काम मागच्या पंधरा वर्षात केलं ते पुढे घेऊन जाण्याचे काम यशस्वीपणे करेन. पंधरा वर्षात त्यांनी या पाच जिल्ह्यातील लोकांशी जो ऋणानुबंध तयार केलेला आहे, तो ऋणानुबंध तेवढ्याच ताकतीने पुढे घेऊन जाण्याचे काम कारकिर्दीत करेन.
युवकांनी ताकदीने निवडणुकीत उतरावं…
नाशिकसह इतर जिल्ह्यातील मतदारांनी जस सुधीर तांबे यांच्यावर जसं तीन वेळा प्रेम आपण सगळ्यांनी केलं. त्या पद्धतीचे प्रेम माझ्यावर करावं असं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. संगमनेर तालुक्याचे मतदान जे आहे, ते या सगळ्या मतदानामध्ये सर्वाधिक मतदान जवळजवळ 31 हजार मतदान आहे. ते फक्त संगमनेर तालुक्यामध्ये आहे. म्हणून संगमनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यातील तसेच सर्व धुळे, जळगाव, नंदुरबारमधील सर्वच मतदारांनी डॉ. सुधीर तांबे यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि आमच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या लोकांना एवढेच आवाहन करतो की, आपण सगळ्यांनी आमच्या पाठिशी उभे राहावं. मागचे पाच-सात दिवस झाले, आपण बरच राजकारण टीव्हीवर आणि मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल, याच्यावर आता खूप राजकारण झालं. या सगळ्या राजकारणावर योग्य वेळ आल्यावर आपण बोलूच, परंतु आता सध्या तीस तारखेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष करुन युवकांना आवाहन आहे की एक युवक प्रतिनिधी म्हणून सगळ्यांनी अजून ताकदीने आता उतरुन या निवडणुकीमध्ये भाग घ्यावा, असं आवाहन सत्यजीत तांबे यांनी केले आहे.
Crypto іs brutal, еspecially іf үou’re neᴡ to it.
You cɑn make a lot of money when you master tһe right information,
һowever үou’ll be at risk if yߋu make a mistake and ɡеt the wrong idea.
Quantu Ai is a great toool for anyone from beginners tⲟ professionals.
Ƭһe trading bots they hsve аllow yоu to start.
There’ѕ plenty of info to гead aboսt the different types of crypto.
Thhe app ρrovides news about developments in the market, ɑnd іt is pοssible t᧐ subscribe to experts ѡithin the app.