Nashik Vinayak Raut : मोदींच्या (Narendra Modi सभेला लोकांना फसवून आणलं, मुंबईच्या (Mumbai)) फेरीवाल्यांना फसवून मनपाच्या बसमधून आणून एक हजार रुपयांच्या बोलीवर सभेला बसवले होते. तर दुसरीकडे मोदींचे भाषण होत असताना अर्धी सभा गेलेली असेल, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. 

नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या शिवसेना पुरस्कृतत उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला शिवसेना ठाकरे गटाचे दिग्गज नेते सुभाष देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत उपस्थित होते. मेळावा सत्यजित तांबे यांचा पराभव करण्याची रणनीती ठरवण्यासाठी असला तरी ठाकरे गटाच्या तीनही नेत्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. उद्धव ठाकरेंचा पराभव करण्यासाठी थेट देशाच्या पंतप्रधानांना मुंबईत यावे लागत आहे. ऋतुजा लटके यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आणि विजयाची मुहूर्तमेढ रोवली. 

‘उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान शड्डू ठोकून आले’

यावेळी विनायक राऊत म्हणाले कि, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल घेऊन ज्या ऋतुजा लटके यांनी विजयाची मुहूर्तामेंढ रोवली, निवडून आल्याने पाटील यांचा विजय निश्चित आहे. सध्या दुसऱ्या पक्षातील राजकीय नेते चोरणाऱ्याची टोळी आली आहे. लोकशाहीचे मुडदे पडण्याचे काम भाजपकडून सुरु असून स्वतःच्या पक्षाशी बेईमानी करुन दुसऱ्या पक्षाची लाचारी करणाऱ्याची बरोबरी होऊ शकत नसल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत भारत जोडो यात्रेला गेलेत आणि भारत एकसंध ठेवण्याची भाषा करणारे बिकेसीमध्ये आहेत. भाडोत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कमी पडले म्हणून पंतप्रधान यांना मुंबईत यावे लागले आहे, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान शड्डू ठोकून आले आहेत. किती खाली येणार आमशा पडवीसारखा गरीब घरातील मुलगा आमदार झाला, जे बाळासाहेबांनी केले, तेच उद्धव ठाकरे करत असल्याचे राऊत म्हणाले. 

लोकांना फसवून आणलं गेलं…

मोदींच्या सभेला लोकांना फसवून आणलं गेलं, मुंबईच्या फेरीवाल्यांना फसवून मनपाच्या बसमधून आणून एक हजार रुपयांच्या बोलीवर सभेला बसवले होते. तर दुसरीकडे मोदींचे भाषण होत असताना अर्धी सभा गेलेली असेल. भाजपने स्वतःच्या ताकदीने शिवसेनेशी लढा, आम्ही दाखवून देऊ शिवसेनेची ताकद किती आहे ते असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. मोदी यांनी मुंबईच्या सभेत जो भगवा परिधान केला, तो साधू संत, बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. कौरवांचे सैन्य उद्धव ठाकरे यांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न भाजप करत आहेत. पण हा चक्रव्यूह भेदून उद्धव ठाकरे पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आणणार असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तसेच सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणारा कपिल पाटील हा दुतोंड्या प्राणी असून त्यांचा नौटंकीपणा आम्ही चालू देणार नाही. शुभांगी पाटील आणि नागपूरच्या उमेदवाराला पाठिंबा द्या, अन्यथा मुंबईत तुमचा बँड बाजा वाजवू, केवळ पहिल्या पसंतीचे मत द्या बाकी नाही, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. 

news reels New Reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here