शाही सोहळा सुरू असताना अचानक एका कुत्र्याची एन्ट्री झाल्याने अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा कुत्रा अंबानी कुटुंबीयांचा पाळलेला कुत्रा आहे. अनंत अंबानी यांना प्राण्यांवर अतिशय प्रेम आहे. त्यांच्या या खास क्षणी त्यांच्या कुत्र्यालाही रिंग बेअरर म्हणून मान देण्यात आला होता.

घरातच झाला साखरपुड्याचा कार्यक्रम
अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानीच करण्यात आला. या कार्यक्रमाला अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. अनेकांच्या उपस्थितीत या दोघांचा साखरपुडा पार पडला.

हेही वाचा – गुलाबी लेहेंगा, हातभर मेहेंदी, भरजरी ज्वेलरी; अंबानींच्या धाकट्या सुनेचा साखरपुड्याआधी शाही थाट
काय आहे गोलधना विधी?
अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्यात गोलधना आणि चुनरी हे विधी पार पडले. गोलधनाचा अर्थ गुळ आणि धणे असा होतो. गुजराती परंपरेमध्ये साखरपुड्यावेळी या गोष्टींचा वापर केला जातो. या दोन्ही गोष्टी मुलाच्या घरी सर्व उपस्थितांमध्ये दिल्या जातात. तसंच मुलीचे कुटुंबीय मुलाच्या घरी भेटवस्तू आणि मिठाई घेऊन येतात. या विधीनंतर अंगठ्या एक्सचेंज केल्या जातात.
मागील वर्षी झाला होता रोका
दोन दिवस आधी १७ जानेवारीला राधिका मर्चेंटच्या मेहेंदीचा कार्यक्रम पार पडला. अनंत आणि राधिका यांचा मागील वर्षी २९ डिसेंबरला राजस्थानमधील नाथद्वारामध्ये श्रीनाथजी मंदिरात रोका झाला होता.