मुंबई : महाराष्ट्राच्या विधान भवनात बाळासाहेब यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे. २३ जानेवारीला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. महाराष्ट्राच्या विधान भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये हे तैलचित्र लावण्यात येणार आहे. बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी भव्य कार्यक्रम होणार आहे. चित्रकार चंद्रकला कदम यांनी हे तैलचित्र साकारलं आहे.

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे लाकडे नेते आणि आवडते व्यक्तिमत्व होते. यामुळे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र काढताना मनावर एकप्रकारचं दडपण होतं. सरकारडून ऑर्डर मिळाल्यानंतर दीड महिन्यात मी बाळासाहेबांचं तैलचित्र काढलं. जीव ओतून मी है तैलचित्र काढलं आहे, असं चंद्रकला कदम यांनी सांगितलं.

बाळासाहेब हे एक उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांनी लोकांसाठी आणि समाजकल्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. या सगळ्या गोष्टींचा आढावा त्यांच्या चेहऱ्यावर आणायचा होता. बाळासाहेब म्हटलं की त्यांची एक प्रतिमा डोळ्यासमोर येते. भगवा रंग, रुद्राक्षाच्या माळा हे सर्व येणं गरजेचच आहे. यामुळे त्यांच्या चेहऱ्याचा जो बोलकेपणा, दरारा हा त्यांच्या नजरेतून आणण्याचा प्रयत्न केला आहे. चेहरा आणि डोळे यावर मी अधिक लक्ष केंद्रीत केलं, अशी माहिती चित्रकार चंद्रकला कदम यांनी दिली.

विधान भवनातून आपल्याला फोटो देण्यात आला होता. त्या फोटोवरून मी बाळासाहेबांचं तैलचित्र काढलं. चित्र काढताना जो काही चेहरा आवश्यक असतो लाइट ॲण्ड शेड या दृष्टीने सर्वच बाजूंनी विचार करायला लागतोय. कारण चेहऱ्यावर डेप्थ यायला हवी. यामुळे चहऱ्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही चार पाच फोटो बघतो आणि मग तैलचित्र काढायला घेतो. पण इथे तसं न होता एकच चेहरा देण्यात आला होता. त्यामुळे आपल्याला त्यावरच शंभर टक्के काम करावं लागलं, असं कदम यांनी सांगितलं.

balasaheb thackeray portrait to be unveiled at Vidhan Bhavan

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र

बाळासाहेबांचं चे तैलचित्र काढलं आहे, त्याने मी समाधानी आहे. आमच्या हृदयातही त्यांचं स्थान आहे. ते आमच्या खूप जवळचे होते. आणि आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं होतं. त्यामुळे त्यांचा चेहरा डोक्यात फिक्स झालेला होता. ते सगळं विचारात घेऊन मी काम सुरू केलं. आणि चेहऱ्यावर भाव आणता आले, असं त्या म्हणाल्या. बाळासाहेबांशी भेटही झालेली. आम्ही जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तैलचित्र काढलं त्यानंतर ते पहिल्यांदा बाळासाहेबांना दाखवलं होतं. त्यांच्या सूचेवरून काही बदल केले होते, असंही कदम या पुढे म्हणाल्या.

बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याची

हा एक योगायोग आणि दैवचं म्हणावं. मला बाळासाहेबांचं तैलचित्र काढण्याची संधी मिळाली. यामुळे सर्व भावना घेऊनच मी त्यांचं तैलचित्र काढलं. मी केलेली कलाकृती विधान भवनात लागणार याचा मला खूप आनंद झाला. सावरकरांच्या तैलचित्रा एवढचं बाळासाहेबांचं तैलचित्र काढणं अवघड होतं. बाळासाहेब हे फक्त व्यक्ती म्हणून नाही तर लोकांच्या भावनाही त्यात उतरल्या पाहिजेत, अशा दृष्टीने मी काम केलं, असं त्यांनी सांगितलं.

सरकारी अधिकाऱ्यांमुळे सरकारला भुर्दंड; ५ कोटींसाठी अडून बसले, पण आता कंत्राटदाराला द्यावे लागणार ३०० कोटी

ठाकरे घराण्याशी आमचे खूप घरोब्याचे संबंध आहेत. यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांनी या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला यावं. राजकारण सोडून एक चित्रकार म्हणून त्यांनी यावं. राज आणि उद्धव ठाकरे हे चांगेल चित्रकार आहेत. यामुळे ते आले तर हा एकप्रकारचा माझा सन्मानच असेल. यामुळे बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या निमित्ताने तरी ठाकरे कुटुंबीयांनी यावं, असं आवाहन चंद्रकला कदम यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here