Nashik News : अवघ्या तेरा दिवसांच्या बालकाच्या हृदयावरील ‘बलून पलमोनरी वॉलवूप्लास्टी’ ही अतिशय गुंतागुंतीची व विना टाक्यांची शस्त्रक्रिया नाशिकमध्ये (Nashik) यशस्वी झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या रक्तातील ऑक्सिजनचे (Oxyjen) प्रमाण 35 टक्क्यांवरून 85 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, पुढील दोन महिन्यात हे बाळ अन्य बाळांप्रमाणे सर्वसाधारण जीवन जगू शकणार आहे. 

कोपरगाव (Kopargoan) येथील शिवांश मयूर इंदारके या 13 दिवसांच्या बालकाला पल्‍मोनरी स्‍टीनॉसीस (Pulmonary Stenosis) या हृदयाच्या झडपेशी संबंधित दुर्मिळ आजाराचा निदान झालं. हे बाळ उपचारांसाठी नाशिकला आणण्यात आलं. तेव्हा त्याची प्रकृती खूपच खालावली होती. त्याला व्यवस्थित श्वास घेणे ही शक्य होत नव्हते. त्याच्या हृदयाच्या उजव्या कप्प्याची झडप बंद झाली होती. त्यामुळे एकूणच शरीरातच रक्तपुरवठा होण्यात अडचण निर्माण झाली होती. बाळाला दवाखान्यात आणलं तेव्हा रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण 35 टक्के होते. त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण 85 टक्क्यांवर गेले आहे. या शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या पालकांनी समाधान व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 

कोपरगाव तालुक्यातील शिवांश मयुर इंदारके या 13 दिवसांच्‍या बालकाला क्रिटीकल पल्‍मोनरी स्‍टीनॉसीस या दुर्मिळ आजाराचे निदान झाले होते. प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.राहुल होळकर यांनी बाळाला तपासण्यानंतर आजाराचे निदान केले. परीस्‍थितीचे गांभीर्य ओळखून त्‍यांनी तातडीने  बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ललित लवणकर यांच्‍याकडे उपचारार्थ पाठविले. यावेळी बाळाच्या रक्‍तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण 35 टक्‍यांपर्यंत खालावलेले होते व बाळाचे वजन 2 किलो 700 ग्रॅम होते. त्‍याच्‍या जीवाला असलेला धोका लक्षात घेता, शस्‍त्रक्रिया करणे आवश्‍यक होते. क्‍लिष्ट व गुंतागुंतीची ‘बलून पल्‍मोनरी वॉल्वलोप्‍लास्‍टी’ ही शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाल्‍याने बालकाला नवजीवन मिळाले. 

दरम्यान महिलेला दहा ते पंधरा वर्षांनी गर्भधारणा होणे, कुटुंबात हृदयाशी संबंधित आजाराची पार्श्वभूमीवर असणे आणि गर्भधारणेसाठी विशेष उपचार पद्धतीचा अवलंब केला असेल तर अशा गर्भवती महिलांच्या 20 ते 22 आठवड्यांच्या काळात बाळाच्या हृदयाशी संबंधित काही इको टेस्ट करून घ्यायला हव्यात. यामुळे बाळाचे हृदयाशी संबंधित दुर्धर आजार टाळता येतात. तसेच एक टक्का बालकांमध्ये हृदयरोग तर 0.01 बालकांत पल्‍मोनरी स्‍टीनॉसीस सारखे दुर्मिळ आजार आढळत असल्याची माहिती नाशिक मधील डॉ. ललित लवणकर यांनी दिली. 

news reels New Reels

विनाटाक्‍याची यशस्‍वी शस्‍त्रक्रिया

या प्रकरणात बाळाच्‍या हृदयातील उजव्‍या बाजूच्‍या खालचा कप्पा व रक्‍तवाहिनी यांच्‍यात अडथळा निर्माण झाल्‍याने झडपेला अडथळा निर्माण होत होता. ही अत्‍यंत दुर्मिळ वैद्यकीय स्‍थिती असून, बाळाच्‍या जीवाला धोका निर्माण झालेला होता. त्‍याचे रक्‍तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण 35 टक्‍यांपर्यंत खालावले होते. क्‍लिष्ट व गुंतागुंतीची असलेली विनाटाक्‍याची शस्‍त्रक्रिया यशस्‍वी केली. या शस्‍त्रक्रियेदरम्‍यान बालकाच्‍या मांडीच्या रक्‍तवाहिनीतून बलून टाकतांना वाहिनीतील अडथळा दूर करण्यात आला. आता बालक अत्‍यंत सामान्‍य जीवन जगू शकतो. अन्‍य सामान्‍य बालकांप्रमाणे या बालकाचीही वाढ सामान्‍य पद्धतीने होईल, असे डॉ.लवणकर यांनी सांगितले. 

नेमका आजार काय आहे? 

बलून पल्‍मोनरी वॉल्वलोप्‍लास्‍टी हा आजार हृदयाशी संबंधित आहे. या आजारात फुफ्फुसीय झडप हृदयाच्या उजव्या वेंट्रिकल आणि फुफ्फुसीय धमनी दरम्यान आढळते. हा झडपा गेट म्हणून काम करतो, हृदयाच्या आत आणि बाहेर रक्त वाहू देतो. जेव्हा फुफ्फुसाचा झडप पूर्णपणे उघडत नाही किंवा अरुंद होतो, तेव्हा या स्थितीला फुफ्फुसाचा झडप स्टेनोसिस म्हणतात. हा असा आजार आहे कि, जो दुर्मिळ प्रकरणांमध्ये जन्मादरम्यान आढळून येतो. पल्मोनरी व्हॉल्व्ह स्टेनोसिसची बहुतेक प्रकरणे लहान मुलांमध्ये आढळतात. वेळीच उपचार केल्यास निदान शक्य होते. 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

1 COMMENT

  1. І һave used Quantuim Ai fοr a week. It’s easy аnd fun to maqke սse
    of. Support hass Ƅeen great. I’m ѕeeing substantial gains.
    Ƭhiѕ is certainly Ƅetter tһan watching yօur
    cash sitting in ɑ bank account.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here