पुणेः आजच्या घडीला लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हेच प्राधान्य आहे, जगलो तर सर्वकाही आहे, त्यामुळं जगण्यासाठी आधी करोनावर लक्ष देण्याची गरज आहे. आणायला वेळ आहे. ती आपण नागपुरलाही नेऊ, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या आणि अंतिम भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनबाबत त्यांची भूमिका व्यक्त केली. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन, माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. अशी भूमिका या वेळी त्यांनी व्यक्त केली आहे. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाष्य केलं आहे. आजच्या घडीला आपल्या जीवाचं रक्षण करणे याला प्राधान्य आहे. जगलो तर सर्वकाही करता येईल, त्यामुळं जगण्यासाठी आधी कोविडवर लक्ष केंद्रित करायला हवं. बुलेट ट्रेन आणायला वेळ आहे. ती आपण नागपुरलाही नेऊ, नागपूर महामार्ग होतोच आहे. त्यामुळं राजकीच टिकाटिप्पणी करण्याची ही वेळ नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

वाचाः

राज्यातील सत्ता तीन चाकांवर असली तरी त्याचे स्टेअरिंग माझ्या हाती आहे, या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरही दरेकर यांनी भाष्य केलं आहे. सरकारची गाडी किती चाकी आहे. पुढे व मागे कोण बसलंय, गाडी खड्ड्यात आहे की बाजूला जातेय, यापेक्षा करोनाचा विषय महत्त्वाचा आहे. राजकारणापलीकडे जाऊन सर्वांना बरोबर घेऊन करोनाच्या संकटाला सामोरे जायला पाहिजे. जातीने लक्ष देऊन उपाययोजना केली पाहिजे. करोनावर वेळेत नियोजन झाले नाही तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, याचे सरकार म्हणून भान ठेवलं पाहिजे, असं दरेकर म्हणाले आहेत.

वाचाः

दरम्यान, महाराष्ट्रातलं सरकार लोकशाही विरोधी आहे, असं ते सांगतात. मग सरकार पाडणं लोकशाही आहे का? फोडाफोडी करून सरकार आणणं ही त्यांची लोकशाही आहे. या असल्या लोकशाहीलाच शिवसेना प्रमुखांचा विरोध होता, असं सांगतानाच राज्यात ऑपरेशन लोटस होणार की नाही, हे मला माहीत नाही. ऑपरेशन लोटस करायचं तर करा. मी कशाला भाकीत करू, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here