नवी दिल्ली: राजस्थान संकट: राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर हल्ला केला. भाजपविरोधात लोकांना एकत्र करण्यासाठी राहुल गांधींनी रविवारी एक व्हिडिओ शेअर केला. #SpeakUpForDemocracy या हॅशटॅगद्वारे राहुल गांधींनी ट्वीट केले की, ‘एकत्रित व्हा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवा.’ राजस्थानात निर्माण झालेल्या राजकीय संकटाबाबत काँग्रेस सोमवारी देशव्यापी विरोधाची योजना तयार करत आहे. गरज पडल्यास काँग्रेसने राष्ट्रपती भवनाच्या बाहेरही निदर्शने करण्याची तयारी करत आहे.

राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसने भाजपवर ‘राज्यघटनेची पायमल्ली करत लोकशाही उद्ध्वस्त केल्याचा’ आरोप केला आहे. अशा वेळी देश कोरोनाशी लढाई लढत असताना भाजप मात्र घटनेची पायमल्ली करत असल्याचा आरोप व्हिडिओत करण्यात आला आहे. ‘राजस्थानमधील लोकांनी सन २०१८ मध्ये निवडून दिलेले सरकार पाडण्याचा डाव भाजप आखत आहे. मध्ये प्रदेशातही भाजपने तेच केले, असेही व्हिडिओत म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये काँग्रेसने विधानसभेचे अधिवेशन लवकरात लवकर बोलावण्याची मागणी केली असून, हा आमचा घटनात्मक हक्क असल्याचे म्हटले आहे. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी विधानसभा अधिवेशन सुरू करण्याचा प्रस्ताव नाकारला आहे.

वाचा:
याशिवाय राहुल गांधींनी दुसरेही ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, ‘भारतीय लोकशाही राज्यघटनेच्या आधारावर लोकांच्या आवाजाने चालेल. भारतीय जनता पक्षाचे कपटी षडयंत्र नाकारून देशातील जनता लोकशाही आणि राज्यघटनेचे रक्षण करेल.

वाचा:

दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांना नवीन प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव विधानसभेचे अधिवेशन बोलवण्यासाठी पाठविण्यात आला आहे. विधानसभा अधिवेशनाच्या कार्यक्रम मुख्यता कोरोनाच्या संकटावरील चर्चा करण्यासाठी आखण्यात आल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. यात काही विधेयके मंजूर करण्याबाबतची देखील चर्चा आहे. मात्र, या प्रस्तावात विश्वासदर्शक ठरावाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ३१ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी प्रस्तावात केली आहे. आपण नव्या प्रस्तावावर विचार करत असल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here