नवी दिल्लीः भारत-चीन सीमेवर बर्‍याच काळापासून चीनच्या हरकती सुरू आहेत. आता भारताने चीनला त्याच्या चालीने घेरलं आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने सैन्याची जमावण्यास सुरवात केली आहे. आता हेरगिरी करणारा भारताचा एक उपग्रह नुकताच चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटवरून गेला. या उपग्रहाने बरीच माहिती गोळा केली आहे. त्यानंतर चीनमध्ये खळबळ उडाली आहे.

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) चा हा उपग्रह EMISAT गुप्त माहिती गोळा करण्याचे काम करतो. यात ELINT म्हणजेच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस सिस्टम ‘कौटिल्य’ बसवण्यात आले आहे. ज्यात संरक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण माहिती एकत्रित करण्याची क्षमता आहे. अरुणाचल प्रदेश जवळील तिबेटच्या त्या भागावरून हा उपग्रह नुकताच गेला जिथे पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) कब्जा केलेला आहे.

शत्रूचे रेडिओ सिग्नल वाचतो भारताचा ‘कौटिल्य’

इस्रोने बनवलेल्या EMISAT या उपग्रहाची ELINT सिस्टममध्ये शत्रूच्या प्रदेशात वापरल्या जाणार्‍या रेडिओ सिग्नल्स वाचतो. लडाखमध्ये पँगॉंग त्सोमधील फिंगर ४ विषयी भारत-चीनमधील चर्चा फिसकटल्यानंतर दुसर्‍याच दिवशी हा उपग्रह तिबेटवरून गेला. यामुळे चीनमध्ये खळबळ उडाली आहे. तर दोन्ही देश लडाखमधील सीमावादावर पुढील चर्चा करण्यास तयार आहेत.

डेपसांग सेक्टरमध्ये चीने आपल्या सैन्याची जमवाजमवही केली आहे. चिनी सैनिक एलएसीजवळ खड्डे खोदतानाही दिसून आलेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. पीएलएने यापूर्वी २०१३ मध्ये देखील डेपसांगमध्ये घुसखोरी केली होती. भारताचा रेडार उपग्रह RISAT-2BR1 चीनच्या पिप्लस लिबरेशन आर्मी नेव्ही (प्लॅन) च्या जिबूती बेस (आफ्रिका) वरून गेला होता. जिबूती नेव्ही बेस हा चीनचा एकमेव बेस आहे जो देशाबाहेर आहे. चीनने जिबूतीजवळ आपले तीन लढाऊ जहाज तैनात केले आहेत, असं सांगण्यात येत होतं.

पाकिस्तानवरही लक्ष ठेवतो हा उपग्रह

यापूर्वी भारतीय उपग्रह EMISAT च्या ELINTने पाकिस्तान नौदलाच्या ओरमारा बेस (जिन्ना नेव्ही बेस) वरून फिरला होता. या ठिकाणी पाकिस्तानने चीनच्या मदतीने पाणबुड्या गोळ्या केल्या आहेत. भारत आणि चीन यांच्यात चर्चा सुरूच असली तरी पाकिस्तान आणि चीन एकत्र येऊन येत्या हिवाळ्यापर्यंत काश्मीर आणि लडाखमध्ये भारताविरूद्ध दुहेरी लढाईची तयारी करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here