धुळे : धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या एकवीरा देवी मंदिर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दोन महिला राहत असून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याचं समोर आले आहे. या संदर्भात मंदिर प्रशासनाला तसेच देवपूर पोलीस प्रशासनाला सूचना देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही. या महिलांच्या मंदिर परिसरात असलेल्या दुकानदारांना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.

महिला डॉन पायल आणि पिंकी डॉन अशी त्यांची नावे आहेत. या महिला आठ ते दहा साथीदारांच्या मदतीने देवदर्शनासाठी येणाऱ्या त्रास देऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी करतात आणि पैसे न दिल्यास शिवीगाळ करून धमकी देतात. याच मंदिर परिसरात असलेल्या दुकानदारांकडून हप्ते वसुलीची मागणी देखील करतात. पैसे न दिल्यास दुकानदारांशी हुज्जत घालतात.

बायकोला छेडलं म्हणून पोलिसांत गेला पण आरोपी मोकाट, पतीने पोलीस स्टेशनमध्येच केलं भयंकर कृत्य
मंदिर परिसरात या दोघी महिलांचा मोठ्या प्रमाणात हैदोस वाढला आहे. मंदिराच्या ओट्यावर बसून दारू पितात हा सर्व प्रकार देवपूर पोलीस पोलिसांच्या निदर्शनास आणून देखील काहीच उपयोग होत नाही. सदर हा प्रकार एक ते दीड वर्षापासून सुरू आहे. मंदिर परिसरात हा प्रकार बंद व्हावा म्हणून एकविरा देवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांना देखील परिसरातील दुकानदारांना हा सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर देवपूर पोलीस स्टेशन असून पोलीस काहीच करत नाही, म्हणून व्यापारी आणि नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. हा सर्व प्रकार कुठेतरी थांबावा अशी मागणी परिसरातील दुकानदारांनी आणि भाविकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here