Nagpur News : बेसा-बेलतरोडी आणि पिपळ-घोघली या दोन ग्रामंचायतींची मिळून एक नगरपंचायत करण्यात आली आहे. ‘बेसा-पिपळा’ या नावाने ही नगरपंचायत असणार आहे. याबाबतची अंतिम अधिसूचना शुक्रवारी (20 जानेवारी) जारी करण्यात आली. त्यामुळे विद्यमान ग्रामपंचायत बरखास्त झाली. दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायत करण्याची मागणी होती. त्याबाबतचा प्रस्तावही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवण्यात आला होता. राज्य शासनाने याला मंजुरी दिली. सप्टेंबर महिन्यातच यावर सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले होते. शुक्रवारी याला अंतिम रुप देण्यात आले. यामुळे जिल्हा परिषदेचे क्षेत्र कमी झाले आहे. परंतु एकही जिल्हा परिषद सर्कल कमी होत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांच्या सदस्यत्वावर परिणाम होणार नाही. दोन्ही ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते.

प्रशासकाची नियुक्ती

नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना निघाल्याने दोन्ही ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. वानाडोंगरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांची प्रशासक म्हणून नियुक्त केली आहे. येथील एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक चांगलीच चर्चेत होती.

सरकारकडून आचारसंहितेचा भंग? 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नागपूर विभागात आचारसंहिता लागू करण्यात आली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीत आचारसंहिता असून तिचा भंग करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिला होता. या दोन्ही ग्रामपंचायती एनएमआरडीच्या (Nagpur Metro Region Development Authority) कक्षेत येत होत्या. परंतु आता दोन्ही ग्रामपंचायती मिळून नगरपंचायत झाल्याने त्या एनएमआरडीएच्या (NMRDA) कक्षेतून बाहेर निघाल्याचे सांगण्यात येते.

बहादुरा प्रतीक्षेतच

बेसा, बेलतरोडी, पिपळा, घोगलीसह बहादुरा-खरबी-गोन्ही सिम मिळून एक नगरपंचायत करण्याची अधिसूचना 13 सप्टेंबरला अधिसूचना जारी करण्यात आली होती. यावर 30 दिवसांच्या आता सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले होते. यावर सुनावणीही झाली. परंतु फक्त बेसा-पिपळा नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना करण्यात आली. बहादुरा नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बहादुरा नगरपंचायतीसाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.

news reels New Reels

या क्षेत्राचा असणार समावेश

  • मौजा बेसा सर्व्हे नं. 1 ते 96
  • मौजा बेलतरोडी सर्व्हे नं. 1 ते 142
  • मौजा पिपळा सर्व्हे नं. 1 ते 221
  • मौजा घोघली सर्व्हे नं. 1 ते 41

ही बातमी देखील वाचा…

शिक्षक, पदवीधर मतदारांनो ही काळजी घ्या, अन्यथा तुमचे मतदान ठरेल अवैध, जाणून घ्या सविस्तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here