मुझफ्फरपूर: बिहारच्या मुझफ्फरपूर एका व्यक्तीला सासुरवाडीत जाणं महागात पडलं. पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेलेल्या पतीला सासरच्या लोकांनी जबर मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे पती बेशुद्ध पडला. त्यानंतर सासरच्या लोकांनी जावयाच्या गुप्तांगात ग्लास टाकला. त्यावेळी तरुण बेशुद्ध पडला असल्यानं तरुणाला त्याच्यासोबत नेमकं काय झालं आहे ते समजलं नाही. पोटात दुखू लागल्यानं आणि वेदना वाढत गेल्यानं पीडित तरुण डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्सरे काढला. त्यावेळी त्यांना तरुणाच्या पोटात ग्लास दिसला.

पीडित तरुण साहेबगंजच्या रामपूरचा रहिवासी आहे. पीडित तरुणासोबत १५ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. दोन आठवड्यांपूर्वी तरुण त्याच्या पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा मेहुण्याशी आणि कुटुंबातील इतरांशी वाद झाला. सासरच्या लोकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तरुण बेशुद्ध पडला. त्यानंतर सासरच्या माणसांनी त्याच्या गुप्तांगात संपूर्ण ग्लास टाकला. शुद्ध आल्यानंतर तरुण आपल्या गावी परतला.
घंटा वाजली, शाळा भरली; वर्गात जाताच मुलींची किंकाळी; मुख्याध्यापकांना पाहून अंगावर काटा
गावी परतल्यानंतर तरुणाच्या पोटात दुखू लागलं. वेदना वाढू लागल्यानं त्यानं गुरुवारी एसकेएमसीएच रुग्णालय गाठलं. तिथे डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्सरे गाठला. गुप्तांगात सातत्यानं वेदना होत असल्यानं तरुण सुरुवातीला गावातील वैद्याकडे गेला. त्यांनी तरुणावर उपचार केले. इंजेक्शन दिल्यानंतर वेदना कमी व्हायच्या. मात्र काही वेळात, इंजेक्शनचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा त्रास सुरू व्हायचा. त्यामुळे तरुण एसकेएमसीएचला पोहोचला.
तुझी का माझी? बॉयफ्रेंड, एक्स बॉयफ्रेंड एकत्रच घरी; दोघांना पाहताच तरुणीची विहिरीत उडी अन्…
शुक्रवारी तरुणाची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे त्याला एसकेएमसीएचमधून पाटण्याला हलवण्यात आलं. तरुणाच्या आतड्या आणि गुदद्वाराच्या मध्ये ग्लास अडकला होता. हा ग्लास तरुणाच्या गुप्तांगातून आत टाकण्यात आला होता. शस्त्रक्रिया करून ग्लास बाहेर काढण्यात आल्याचं एसकेएमसीएचच्या डॉक्टरांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here