घटना बडागाव येथील आहे. या ठिकाणी ५० वर्षीय सियाराम त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. सहा महिन्यांपूर्वी घरातील एका सदस्याच्या शरीराला खाज सुटली. त्यानंतर त्याची त्वचा काळवंडली. त्यांनी सुरुवातीला गावातील वैद्याकडेच उपचार केले. मात्र गुण न आल्यानं शाहजहापूरमधील खासगी डॉक्टरकडे उपचार सुरू केले. मात्र त्वचेचा काळा रंग गडद होत गेला. कुटुंबातील सर्वच्या सर्व ८ जणांना हाच त्रास होऊ लागला. एका मुलीचा मृत्यूही झाला.
कुटुंबाला रहस्यमयी आजार झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर डॉक्टरांचं एक पथक कुटुंबाच्या घरी पोहोचलं. संपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. हा त्वचेशी संबंधित आजार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हा आजार कुटुंबाला कसा झाला याबद्दल अद्याप तरी डॉक्टरांकडे कोणतीही माहिती नाही. सध्या या आजाराचा अभ्यास सुरू आहे. त्यानंतर उपचाराची योग्य पद्धत समजू शकेल, असं डॉक्टर म्हणाले.
Home Maharashtra mysterious disease, त्वचा काळवंडली, बोटं वाकडी; एकाच कुटुंबातील ८ जणांना रहस्यमय आजार;...