ahmednagar accident, कुटुंब बाहेरगावी, जेवणाचं पार्सल घेऊन वकील निघाला घरी; पुलावर मृत्यूनं गाठलं – lawyer lost life on ahmednagar flyover after vehicle hits him
अहमदनगर: अहमदनगरच्या उड्डाणपुलावर वकिलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. दुचाकीच्या अपघातात नगरमधील अनिरुद्ध रामचंद्र टाक (वय ४६) यांचा मृत्यू झाला. पुलावरील वळणावर काल रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. ऍड. टाक आपल्या दुचाकीवरून घराकडे जात होते. त्यावेळी एका वाहनाने त्यांना धडक दिली.
घरघर लंगर सेवेचे प्रमुख, अहमदनगरचे फूड मॅन हरजीतसिंग वाधवा यांनी घटनास्थळावरून पोलिसांना फोन केला. अपघातात जखमी झालेल्या टाक यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या खिशातील व्हिजिटिंग कार्डवरून त्यांची ओळख पटली. ते एकटेच प्रवास करत होते. त्यांच्या दुचाकीवर जेवणाचे पार्सल लावलेले होते. त्वचा काळवंडली, बोटं वाकडी; एकाच कुटुंबातील ८ जणांना रहस्यमय आजार; एकाचा मृत्यू अनिरुद्ध टाक यांच्या मोबाईलमधील नंबर शोधून हरजीतसिंह आणि पोलीस यांनी टाक यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला. टाक यांचे कुटुंबीय बाहेर गावी गेलेले असून टाक एकटेच घरी होते. त्यामुळे अन्य नातेवाईक तेथे आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रिया सुरु केली. ऍड टाक अहमदनगरच्या कामगार न्यायालयात वकिली करत होते.
हा पूल तयार झाल्यापासून त्यावर छोटे मोठे अपघात होत आहेत. या पुलावर काल वकिलाचा बळी गेला. त्यामुळे या पुलाची रचना आणि वाहतूक नियोजनातील त्रुटी यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.