लखनऊ: उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. पाच वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर सना नावाच्या तरुणीनं तिच्या प्रेयसीसाठी २०२० मध्ये लिंगबदल करून घेतला. यासाठी सनानं १२ लाख रुपये खर्च केले. दोघांनी आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याच्या, लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र आता प्रेयसीनं लग्नासाठी नकार दिला आहे. त्यामुळे सनाची सोहेल झालेल्या तरुणीनं न्यायालयाकडे दाद मागितली आहे.

समलैंगिक सबंधांमध्ये विश्वासघात झाल्याचं प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे. बबिना पोलिसांनी प्रेयसीला अटक करून न्यायालयात हजर केलं. मात्र तिला जामीन मिळाला. खटल्याची पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीला आहे. सोनम आणि सना आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला आहेत. त्यानंतर सनानं लिंगबदल करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात जून २०२० मध्ये शस्त्रक्रिया पार पडली. सना सोहेल बनली.
कोंबड्यांची झुंज पाहायला गाव जमला; कोंबडे उडाले, मालक अन् प्रेक्षकाचा जीव गेला
२०१६ मध्ये प्रेमनगर परिसरात सना एका घरात भाड्यानं राहायची. तिथे सनाची मैत्री घरमालकाची मुलगी सोनल श्रीवास्तवसोबत झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. दोघांच्या कुटुंबीयांना त्यांच्या नात्याची कल्पना नव्हती. २०१७ मध्ये त्यांना याबद्दल समजलं आणि एकच गोंधळ झाला. सनाला घर रिकामं करावं लागलं.

सना आणि सोनम यांनी कुटुंबांचा विरोध झुगारून देत एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला. सोनम आणि सना सोबत राहू लागल्या. २०१७ मध्ये प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. दोन्ही कुटुंबीयांनी एक-एक पाऊल मागे घेत दोघींना लिव्ह इनमध्ये राहण्याची परवानगी दिली. २०२० मध्ये सनानं लिंगबदल करण्याचा निर्णय घेतला.
एका मांजरीचा मृत्यू अन् तब्बल ३५ कबुतरांवर विषप्रयोग; दोन परिवार भिडले; पोलीस चक्रावले
सनाची सोहेल झाल्यानंतर बऱ्याच त्रासाचा सामना करावा लागला. या शस्त्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी शरीराला वर्षभराचा अवधी लागला. यादरम्यान सोनलचे एका इसमासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे तिनं सना उर्फ सोहेलशी लग्न करण्यास नकार दिला. यानंतर सोहेलनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केलं. सोनमला जामीन मिळाला आहे. पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here