Nashik Shani Mandir : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात नस्तनपूर येथे भारतातील साडेतीन नाही तर साडेसात शनी शक्तीपीठांपैकी एक पुर्णशनीपीठ आहे. आज माघ महिन्यातील अमावस्या निमित्त शनि महाराज चरणी लीन होण्यासाठी भाविकांनी सकाळपासून खूप गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. 

आज शनि अमावस्या (shani Amavasya). आजचा दिवस नांदगाव (Nandgoan) तालुक्यातील नस्तनपूर (Nastanpur Shani Mandir) येथील शनिमंदिरात भगवान शनिदेवाची उपासना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. आज नाशिकसह जिल्ह्यातील असंख्य भाविक या दिवशी दर्शन घेण्यासाठी येतात. या दिवशी यात्रेसह शनि देवाची भव्य मिरवणूक काढली जाते. शनि अमावस्याव्यतिरिक्त सर्व शनिवारी शनिदेवाची पूजा करणे अत्यंत अनुकूल मानले जाते. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात नस्तनपूर येथे भारतातील साडेतीन नाही तर साडेसात शनी शक्तीपीठांपैकी एक पुर्णशनीपीठ आहे. येथील शनीपीठ हे स्वयंभू पीठ असून प्रमुख स्थान म्हणून भारतात मान्यता आहे. नांदगाव पासून अवघ्या सात किलोमीटरवर असलेले नस्तनपुर हे गाव हायवे वरच आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. 

शनीदेवाचे दर्शन घेण्यासाठी दररोज भाविक व पर्यटक भेट देत असले तरी दर शनिवारी व अमावस्या दिवशी प्रचंड गर्दी असते. विशेषतः शनी अमावस्येला प्रचंड गर्दी असते. या दिवशी यात्रा असते. तसेच श्रावण महिन्यात व सोमवती अमावस्येला भरपूर भाविक दर्शनासाठी येतात. वर्षभर पर्यटक येत असतात. या देवस्थानचा झालेला जीर्णोद्धार, मंदिर रचना, विलोभनीय गाभारा, सुसज्ज निवास, बालोद्यान, निसर्गरम्य वातावरणासह विविध सोयी सुविधा असंख्य पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर हे धार्मिक क्षेत्र देशभरातील पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.

शनी मंदिराचे वैशिष्ट्य… 

दरम्यान नस्तनपूर येथील पूर्वीचे जुने प्राचीन शनीदेव मंदिर साधे होते, समोर पत्राचे मोठे सभागृह होते. ते आता तसेच असून नवीन अद्ययावत मंदिर दुसऱ्या जागेवर बांधलेले आहे. नवीन जिर्णोद्धार झालेले येथील शनी मंदिर हे पूर्वमुखी म्हणजे सूर्यमुखी आहे. मंदिराची पुर्व पश्चिम लांबी जास्त असून उत्तर दक्षिण रुंदी कमी आहे. मंदिरात भव्य सभागृह आहे. मागील भागात गर्भगृहात शनीदेवाची मूर्ती आहे. शनिदेवाची मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. मूर्तीच्या समोर रजत पादुका असून पादुकांचे दर्शन घेतले जाते. शनिवारी व अमावस्येच्या दिवशी आणि सणांच्या दिवशी शनिदेवांच्या मूर्तीला आरास व सजावट करतात. तसेच शनी देवाचे दर्शनासाठी पुरुषांसोबत स्त्रियांनाही प्रवेश आहे.

news reels New Reels

शनी मंदिराची आख्यायिका 

या मंदिराची आख्यायिका अशी सांगितले जाते कि, पूर्वी या ठिकाणी घनदाट दंडकारण्य होते. पंचवटीत सीतेचे अपहरण झाल्यानंतर राम व लक्ष्मण हे मनमाड जवळील अगस्ती ऋषींच्या आश्रमात पोहचले. तेव्हा अगस्ती ऋषींनी सीतेबद्दल विचारले असता प्रभुरामचंद्रांनी सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी अगस्ती ऋषींनी सांगितले की, रावण व राम आपली रास एकच आहे. आपल्याला शनिदेवाची आराधना करावी लागेल. शनीवर विजय मिळविण्यासाठी शनीदेवाची साडेतीन शक्तीपीठांची स्थापना करावी. तेथून राम पुढील प्रवासासाठी निघालेत असताना सायंकाळी तत्कालीन नसरतपूर आताचे नस्तनपूर येथे पोहचले. घनदाट जंगल व काळोखमुळे तेथेच थांबले. नित्यनेमाने प्रभुरामचंद्रांनी सुर्याची आराधना करतांना वालुकामय मूर्ती त्यांच्या ओजळीत आल्यानंतर याच ठिकाणी प्रथम शनीपीठाची स्थापना रामांनी केली, असे जाणकार सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here