Nagpur News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्ती आणि भाजप नेता मुन्ना यादव यांच्या मुलाने नागपुरात सुरु असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवच्या क्रिकेट सामान्य दरम्यान राडा घातला होता. त्याने पंच आणि सामन्याच्या आयोजकांनाही मारहाण केली होती. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सावध भूमिका घेतली असून ते म्हणाले, ‘जी घटना घडली ती वाईट आहे. यापुढे परत तसं होणार नाही याची काळजी घेऊ. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना खेळात सहभागी करू नये, यावर मी सहमत नाही. कारण जर चांगलं काम करत असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि करायला पाहिजे, असेही नितीन गडकरी म्हणाले.’

ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रकरणावर खासदार क्रीडा महोत्सव संयोजक संदीप जोशी यांना विचारले असता ते म्हणाले,’मुन्ना यादव यांचा मुलगा करण यादव यांनी केलेल्या मारहाणीची आम्ही दखल घेतलेली असून, आम्ही चौकशी करणार आहोत. त्याचा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.’

काय आहे प्रकरण?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात भाजप नेत्याच्या मुलानेच राडा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मुन्ना यादव यांच्या मुलांनी क्रिकेट सामना सुरु असताना पंचांसोबत वाद घालून त्यांना मारहाण केली होती. या सोबतच सामन्याच्या आयोजकांनाही मारहाण केली होती. या संदर्भात पंचांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांच्याकडेही तक्रार केली होती. मात्र कुठलीही कारवाई झाली नसल्याने पंचांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र माध्यमांमध्ये प्रकरण गाजल्यानंतर संयोजकांनी सावध भूमिका घेत वाद शमविण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात सध्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सुरु असेलल्या क्रिकेट सामन्यात यादव यांच्या मुलाने पंच आणि आयोजकांना मारहाण केल्याने या महोत्सवाला गालबोट लागलं.

news reels New Reels

थ्रो बॉलच्या मुद्द्यावरुन सुरु झाला वाद

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती चौकात खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत खामला इलेव्हन आणि स्टार इलेव्हन या दोन संघामध्ये सामना होता. यातील एका संघात मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन आणि करन हे दोघेही खेळत होते. सामना सुरु असताना अर्जुनने थ्रो बॉलच्या मुद्द्यावरुन पंचांशी वाद घालायला सुरुवात केली. पंचांनी त्याला समजावून सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता. अर्जुनने रागाच्या भरात ग्राऊंडवरच गोंधळ घालायला सुरुवात केली. तरीही पंचांनी हा निर्णय मागे घेण्यास नकार दिल्याने त्याने भर मैदानात प्रेक्षकांसमोरच पंचांना आणि आयोजकांना मारहाण केली. इतकेच नव्हे तर यादव समर्थकांनीही वाद शमवण्यापेक्षा अर्जुनला साथ देत मैदानात गोंधळ घातला होता.

ही बातमी देखील वाचा…

नागपूर ते पुणे जाताय, ही बातमी तुमच्यासाठी; ‘ही’ रेल्वे गाडी दोन दिवसांसाठी रद्द; या तीन गाड्यांचे मार्गही बदलले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here