बिजनोर: आईनेच प्रियकराच्या मदतीनं पोटच्या पोराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. मुलानं आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. अनैतिक संबंध लपवण्यासाठी महिलेनं प्रियकराच्या मदतीनं स्वत:च्या मुलाची हत्या केली.

दहा वर्षांचा वरुण खेळता खेळता बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे मामा उमेश कुमार यांनी १६ जानेवारीला नोंदवली. त्यांनी या प्रकरणी चांदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढच्याच दिवशी, १७ जानेवारीच्या संध्याकाळी पाच वाजता वरुणचा मृतदेह गावाजवळ असलेल्या जंगलात सापडला. वरुणची हत्या गळा आवळून झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. वरुणची आई मुन्नी आणि तिचा प्रियकर टिंकू चुन्नी यांना पोलिसांनी अटक केली.
सोनमच्या प्रेमासाठी सना बनली सोहेल; १२ लाख खर्चून लिंग बदललं, पण वेगळाच ‘गेम’ झाला
दोन आरोपींचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. १६ जानेवारीला मुन्नीचा पती बाहेर गेला होता. हीच संधी साधून टिंकू मुन्नीच्या घरी टिंकू मुन्नीच्या घरी गेला. त्यावेळी बाहेर खेळत असलेला वरुण अचानक घरी पोहोचला. त्यानं आईला टिंकूसोबत पाहिलं. टिंकू वरुणचा काका लागतो. वरुणनं पाहिल्यानं आपलं पितळ उघडं पडेल अशी भीती मुन्नी आणि टिंकूला होती. त्यामुळे दोघांनी वरुणची गळा आवळून हत्या केली.
VIDEO: शोरुममधून नवी कार काढली; एक चूक घडली अन् कार गर्दीत घुसली; पादचाऱ्यांना चिरडत सुटली
जवळपास तीन तास वरुणचा मृतदेह घरातच होता. रात्र झाल्यानंतर आरोपी टिंकूनं वरुणचा मृतदेह जंगलात नेऊन टाकला. वरुणनं आईला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. मी पप्पांना सांगणार असं त्यावेळी वरुण बोलून गेला. हे ऐकताच आई आणि टिंकूनं त्याची गळा आवळून हत्या केली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून मुन्नीनं आसपासच्या घरांमध्ये जाऊन वरुणबद्दल विचारणा केली. मात्र पोलीस चौकशीत गुन्हा उघडकीस आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here