भोपाळ: मध्य प्रदेशच्या अशोक नगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. याची माहिती त्या व्यक्तीच्या ११ वर्षीय मुलीला समजताच तिनं विहिरीत उडी घेतली. शेजाऱ्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा मृत्यू झाला. त्यावेळी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अशोक नगर जिल्ह्यातील बरखेडा जागीरमध्ये ही घटना घडली. ३६ वर्षीय रामबाबू धाकड यांना शुक्रवारी सकाळी हृदय विकाराचा झटका आला. रामबाबू शेती करायचे. शुक्रवारी सकाळी ते शेतावर गेले होते. थोड्याच वेळात ते घरी परतले. त्यांच्या हृदयात तीव्र वेदना सुरू झाल्या. नातेवाईक आणि शेजारचे त्यांना घेऊन एका खासगी रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मी पप्पांना सांगणार! आईला प्रियकरासोबत ‘त्या’ अवस्थेत पाहून ओरडला चिमुरडा अन् मग घडलं भयंकर
रामबाबू यांच्या मृत्यूबद्दल समजताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रामबाबू यांची ११ वर्षीय मुलगी साधनाला वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. तिनं घराबाहेर धाव घेतली. शेतात असलेल्या विहिरीत तिनं उडी टाकली. साधना धावत शेताकडे गेल्याचं समजताच नातेवाईक शेतात गेले. मात्र तिथे कोणीच नव्हतं. त्यावेळी काही जणांचं लक्ष विहिरीजवळच्या चपलांकडे गेलं. ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी विहिरीत डोकावून पाहिलं. त्यावेळी त्यांना आतमध्ये साधनाचा मृतदेह तरंगताना दिसला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. दोन तासांनंतर साधनाचा मृतदेह बूहेर काढण्यात आला.
सोनमच्या प्रेमासाठी सना बनली सोहेल; १२ लाख खर्चून लिंग बदललं, पण वेगळाच ‘गेम’ झाला
रामबाबू यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा सर्वात लहान आहे. ११ वर्षांची साधना भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची होती. ती इयत्ता सातवीत शिकत होती. एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुपारी दोघांच्या पार्थिवावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here