Aurangabad News: पोलिसांकडून अनेकदा स्वतःची क्षमता तपासण्यासाठी मॉकड्रिल (Mock Drills) केलं जातं, याचे अनेकदा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. पण अशाच एका मॉकड्रिलच्या व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटला आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराच्या माळीवाडा बस स्थानकात मकर संक्रांतीमुळे असलेल्या गर्दी दरम्यान पोलीस मॉकड्रिल झाले होते.  यावेळी पोलीस शिपाई अतिरेकी भूमिका बजावत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यामांमध्ये व्हायरल झाला होता. मात्र यावेळी अतिरेकीच्या भूमिकेतील व्यक्ती “नारा ए तकबिर अल्लाहु अकबर’ चे घोषणा जोराने ओरडत असल्याचे समोर आले होते. तर याच घोषणेवर औरंगाबादच्या ओसामा कादिर मौलाना यांनी आक्षेप घेतला आहे. धार्मिक भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे.

काय म्हटले आहे तक्रारीत! 

  • ओसामा कादिर मौलाना यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, इस्लाम धर्मामध्ये इश्वरास अल्लाह म्हणून संबोधले जाते आणि अल्लाहचा इस्लाम धर्म तसेच मुस्लिमांमध्ये अतिउच्च आदराचा दर्जा असून संपूर्ण जगातील मुस्लिमामध्ये अल्लाहविषयी अत्यंत आदर व सन्मानपूर्वक भावना आणि आस्था आहे. मात्र अहमदनगर शहराच्या माळीवाडा बस स्थानकात मकर संक्रांतीमुळे असलेल्या गर्दी दरम्यान झालेल्या पोलीस मॉकड्रिलमध्ये पोलीस शिपाई अतिरेकी भूमिका बजावत असल्याचा व्हिडीओ बनवून समाज माध्यामांमध्ये व्हायरल करण्यात आलेले आहे.

 

  • या व्हिडीओत पोलीसांनी लिहिलेल्या स्क्रिप्टनुसार अतिरेकी भूमिकेतील इसमास पकडल्या नंतर अटक करून पोलीस व्हॅनकडे एस टी स्टँड बाहेर घेऊन जात असताना अतिरेकी भूमिकेतील इसम हा “नारा ए तकबिर अल्लाहु अकबर’ चे घोषणा जोराने ओरडत आहे.सरकारी पोलीस हा अतिरेकी भूमिका निभावताना ‘नारा ए तकबिर अल्लाहु अकबर’ म्हणत असल्याचा व्हिडीओ पाहिल्या नंतर पोलीस मॉकड्रिलच्या संबंधित स्क्रिप्ट नुसार अतिरेकी हा मुस्लिम समाजाचाच असतो हा गैरसमज लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी जाणूनबुजून दाखविले गेले असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. 

 

  • तर अल्लाहु अकबरचा अर्थ अल्लाह सर्वश्रेष्ट आहे असा होतो. परंतु वरनमुद अशा जातियवादी मानसिकतेद्वारे मुस्लिमांना अतिरेकी व देशद्रोही दाखवण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहे. पण अतिरेक्यांचा कोणताही धर्म नसतो. मात्र पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालून मुस्लिमद्वेष पसरविणाऱ्या समाजविरोधी विचारसरणीचे लोक महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असल्याचे निष्पन्न होत आहे.

 

news reels New Reels

  • तर ‘नारा ए तकबिर अल्लाहु अकबर’ ही घोषणा अतिरेकी म्हणून कार्यरत असलेला सरकारी पोलीस शिपाई ओरडताना अहमदनगर शहरातील बस स्थानकात उपस्थित असणारे बस प्रवासी, तसेच तो व्हिडिओ पाहत असलेले इतर लोकांच्या मनात ‘नारा ए तकबिर अल्लाहु अकबर’ म्हणणारा प्रत्येक मुस्लीम हा अतिरेकी किंवा अतिरेकी विचाराचा असतो असे दाखविण्यात आलेले आहे. तसेच ‘नारा ए तकबिर अल्लाहु अकबर’ घोषणा देणारा व्यक्ति हा अतिरेकी विचारांचे समर्थन करणारेच असतील, असा पूर्वग्रहदूषित समाजामध्ये निर्माण होत असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. 

कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

त्यामुळे सदरील निंदणीय व बेकायदेशीर कृत्याद्वारे जाणीवपूर्वकरित्या अल्लाह, इस्लाम धर्म तसेच मुस्लिमांबाबत समाज आणि देशात दुद्वेष निर्माण करून दंगली करण्यास प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. तर या कृत्यांमध्ये सहभागी आरोपी व त्यांचे इतर सहकाऱ्यांच्या बेकायदेशीर व संविधान विरोधी कृत्य हे मुस्लिमांना बदनाम करून मुस्लिांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी तक्रारदार ओसामा कदीर मौलाना यांनी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास आपण न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्याचा इशारा देखील त्यांनी दिली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here