sadichha sane missing case update, सदिच्छा साने हत्या प्रकरणाला वेगळं वळण, पोलिसांच्या नव्या दाव्यामुळे खळबळ – police claim that the accused destroyed the evidence in sadichcha sane missing case
मुंबई : पालघर येथील डॉक्टर सदिच्छा साने हिच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी मिथ्थू सिंग आणि अब्दुल जब्बार अन्सारी या दोघांच्या पोलीस कोठडीत शनिवारी २५ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली. या दोन्ही आरोपींनी सदिच्छा हिची हत्या करून मृतदेहासह इतर पुरावे नष्ट केल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यामुळे हत्येच्या भादंवि ३०२ कलमासह पुरावे नष्ट केल्याप्रकरणी २०१ हे कलम वाढविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणारी सदिच्छा साने २९ नोव्हेंबर २०२१ला घरातून निघाली ती परतलीच नाही. तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तांत्रिक पुराव्यांवरून तिचे शेवटचे ठिकाण वांद्रे बँड स्टँड दिसत होते. सदिच्छाला शेवटचे जीवरक्षक मिथ्थू सिंगने पाहिले होते. तिने मिथ्थूसोबत सेल्फीदेखील काढला. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून त्याला अटक केल्यानंतर गेल्या आठवड्यात अब्दुल जब्बार अन्सारी याला पकडण्यात आले. या दोघांची पोलीस कोठडी संपत असल्याने पोलिसांनी शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले. मिथ्थू आणि अन्सारी या दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली फायबर रिंग हस्तगत करण्यात आली असून लाइफ जॅकेट अद्याप मिळाले नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. मिथ्थू याने हत्येची कबुली देऊन मृतदेह टाकल्याची जागा दाखवली आहे. याठिकाणी त्याला नेऊन शोधकार्य हाती घ्यायचे आहे. तसेच सदिच्छा हिची बॅग, हुडी आणि इतर साहित्य हस्तगत करायचे असल्याने दोघांच्या पोलिस कोठडीची आवश्यकता आहे, असे सरकारी वकील एम. एच. चौधरी सांगितले. धक्कादायक VIDEO! एकविरा देवी मंदिर परिसरात लेडी डॉनचा हैदोस, ओट्यावर बसून दारू पितात अन्… आरोपीचे वकील हर्षमन चव्हाण यांनी पोलीस कोठडीची मुदत वाढवून देण्याच्या मागणीस विरोध केला. वर्षभरापासून पोलीस मिथ्थू याची चौकशी करत असून तो सहकार्य करीत आहे. या कालावधीत तो कुठेही पळून गेला नाही. त्यामुळे पोलीस कोठडी वाढवू नये, अशी मागणी त्यांनी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोघांच्या पोलीस कोठडीत २५ जानेवारीपर्यंत वाढ केली.