मुरादाबाद: उत्तर प्रदेशच्या मुराबादमध्ये एक अजब घटना घडली आहे. दोन पत्नींनी पतीसोबत वेळ घालवण्यासाठी वाटणी केली आहे. कुटुंबात वाद वाढू लागल्यानं दोघींनी पतीसोबत वेळ घालवण्यासाठी आठवड्याची वाटणी करून घेतली. कौटुंबिक वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यानंतर हे प्रकरण समुपदेशनासाठी महिला कल्याण केंद्राकडे गेलं. त्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला.

महिला कल्याण केंद्रात कुटुंबाच्या उपस्थितीत एक मार्ग काढण्यात आला. याला तिघांनी होकार दिला. दोन्ही पत्नी सासरीच राहतील आणि पती तीन-तीन दिवस त्यांच्यासोबत असेल, असा तोडगा निघाला. पहिल्या पत्नीसोबत पती सोमवार ते बुधवार राहील. तर गुरुवार ते शनिवार तो दुसऱ्या पत्नीसोबत राहील. रविवारी तो त्याच्या मर्जीनुसार दोघींपैकी कोणासोबतही राहू शकतो.
मी पप्पांना सांगणार! आईला प्रियकरासोबत ‘त्या’ अवस्थेत पाहून ओरडला चिमुरडा अन् मग घडलं भयंकर
प्रकरण काय?
मुरादाबाद शहरातील एका महिलेनं एसएसपी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. पती सासरी नेत नाही. शहरातील एका भाड्याच्या घरात आपल्याला ठेवण्यात आलं आहे. सासरी नेण्याचा आग्रह केल्यास नेण्यास नकार देतो, अशी महिलेची तक्रार होती. काही दिवसांनंतर पती अचानक बेपत्ता झाला.
सोनमच्या प्रेमासाठी सना बनली सोहेल; १२ लाख खर्चून लिंग बदललं, पण वेगळाच ‘गेम’ झाला
पतीचा शोध घेत महिला त्याच्या घरी पोहोचली. त्यावेळी तो आधीपासूनच विवाहित असल्याचं सत्य तिला समजलं. पहिल्या लग्नापासून पतीला तीन मुलं असल्याची माहिती महिलेला समजली. त्यानंतर तिनं एसएसपी कार्यालयात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तिघांनी बोलावलं. त्यांना समुपदेशन केंद्रात पाठवलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here