पाटणा: बिहारच्या जमुईमध्ये घडलेल्या घटनेची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे. नगर परिषदेच्या भछियार मोहल्ल्यात राहणारे रघुनंदन ठठेरा दोन दशकांपासून बेपत्ता होते. कुटुंबानं त्यांना बरंच शोधलं. मात्र त्यांचा ठावठिकाणा सापडला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी आशा सोडली. रघुनंदन या जगात नसल्याचं कुटुंबाला वाटलं. पण तब्बल २३ वर्षांनंतर अचानक चमत्कार घडला आणि रघुनंदन घरी परतले.

दोन दशकांपासून रघुनंदन बेपत्ता होते. त्यांचा ठावठिकाणा सापडत नसल्यानं लोकांनी त्यांच्या पत्नीला अंत्यसंस्कार करण्याचे सल्ले दिले. मात्र महिलेनं त्यांना नकार दिला. तिनं पतीचे अंत्यविधी करणं टाळलं. आता २३ वर्षांनंतर रघुनंदन घरी परतले आहेत. त्यांच्या घरवापसीनं सर्वच हैराण झाले आहेत.
तीन दिवस एकीसोबत; तीन दिवस दुसरीसोबत; २ बायकांकडून नवऱ्याची वाटणी; रविवारचं काय? फैसला झाला
रघुनंदन यांचा व्यवसाय उत्तम सुरू होता. मात्र जुगार आणि मद्यपानामुळे त्यांचं बरंच नुकसान झालं. २००१ मध्ये रघुनंदन जुगारात हरले. यानंतर त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाला सोडून ते नेपाळला गेले. तिथे लहानसहान कामं करून उदरनिर्वाह सुरू होता.

दरम्यानच्या काळात रघुनंदन यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. रघुनंदन यांचा ठावठिकाणाच माहीत नसल्यानं त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली नाही. मात्र त्यांना लेकाच्या मृत्यूचं स्वप्न पडलं. या स्वप्नामुळे त्यांची झोप उडाली. त्यांना अवस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला.
नवरा-बायकोचा वाद, घर पेटलं; थंड नाश्ता कारण ठरला; पत्नीनं स्वत:ला संपवलं की वेगळंच घडलं?
गुरुवारी संध्याकाळी अचानक रघुनंदन भछियारमध्ये परतले. दोन दशकांनंतर परतलेले रघुनंदन त्यांचं घर शोधत होते. त्यावेळी काही जणांनी त्यांना ओळखलं आणि त्यांना घरी घेऊन गेले. त्यांना पाहून पत्नीला आश्चर्याचा धक्का बसला. मात्र अनेक नातेवाईकांना रघुनंदन यांना ओळखताच आलं नाही. ओळख पटण्यासाठी त्यांना बराच वेळ गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here