Nashik Crime : काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये (Nashik) छापेमारी करत परराज्यातील पाच आणि शहरातील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले होते, अशातच पुन्हा एकदा नाशिक शहरांमध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांवर मुंबई नाका पोलिसांनी कारवाई केली आहे.

नाशिक शहरात अवैध धंद्यांसह गुन्हेगारी, देहविक्री व्यवसाय या सर्व गुन्हेगारीच्या (Crime) घटनांना उत आला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील भरवस्तीत सुरू असलेल्या कुंटण खाना चालका विरोधात कारवाई करण्यात आली होती. शहरातील उपनगर पंचवटी अंबड आधी परिसरात सुरू असलेल्या हाय प्रोफाईल स्पा हॉटेलवर नाशिक पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अनैतिक देहविक्रीचा भांडाकोट करत संशयतांना ताब्यात घेतले होते, तर उत्तर प्रदेश आणि आसाम राज्यातील तीन पिढीत महिलांची सुटका केली होती अशातच पुन्हा एकदा देहविक्री व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचं समोर आलं आहे. 

मुंबई नाका पोलिसांनी सापारातून नाशिकच्या वडाळा भागातील एका बंगल्यात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असलेल्या परिसरात धाड टाकली आहे. या कारवाईत तीन पुरुष आणि पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे गेले काही दिवसांपासून नाशिक शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली देहव्या विक्री व्यवसाय करणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार नाशिक शहर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई नाका पोलिसांनी ही कारवाई केली. नाशिकच्या वडा नाका भागात एका बंगल्यात विक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच महिलांचे सुटका करण्यात आले असून तीन संशयतांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोबत नऊ मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान एक संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानुसार संबंधितांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांनी थेट तक्रारी कराव्यात…

नाशिक शहरातील कॉलेज रोडवरील महात्मानगर, तसेच गंगापूरराेड यासारख्या उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या रहिवासी भागातच स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली सर्रास कुंटणखाना चालवला जात असल्याचे पाेलिसांच्याच कारवाईतून वारंवार उघडकीस येत आहे. तरीही संबंधित व्यावसायिक महिना-दाेन महिने व्यवसाय बंद करून पुन्हा हा उद्योग सुरू करत असल्याची धक्कादायक बाब समाेर येत आहे. यापुढे शहरात कुठल्याही भागात मसाज पार्लर स्पाच्या नावाने चालणाऱ्या व्यवसायांवर करडी नजर ठेवली जाणार असून नागरिकांना असं काही आढळल्यास थेट तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

news reels reels

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

धक्कादायक! MPSC च्या मुख्य परीक्षेत उमेदवाराकडून ब्लू टूथ इयरफोनचा वापर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here