मिर्झापूर: उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीनं आत्महत्या केली. मालगाडीच्या समोर उडी घेत तरुणानं जीवन संपवलं. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नीचा मृत्यू झाला. दीपक कुमार (२४) आणि हिरावती (२२) अशी दोघांची नावं आहेत. दीपक कोल्हापुरात नोकरीला होता. सध्या तो घरी आला होता.

शुक्रवारी रात्री जेवल्यानंतर घरातील सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले. दीपक आणि हिरावतीदेखील त्यांच्या खोलीत गेले. रात्री दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दीपक कुमार आत्महत्येची धमकी देऊन घरातून निघाला. हिरावतीही त्याच्या पाठोपाठ निघाली. बिहसडा गावासमोरून जाणाऱ्या रेल्वे रुळांवरून मालगाडी येत असताना दीपकनं उडी घेतली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात हिरावती गंभीर जखमी झाली. सकाळी गस्त घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यानं घटनेची माहिती स्टेशन मास्तरांना दिली.
नवरा-बायकोचा वाद, घर पेटलं; थंड नाश्ता कारण ठरला; पत्नीनं स्वत:ला संपवलं की वेगळंच घडलं?
मालगाडीच्या चालकानंदेखील घटनेची माहिती गैपुरा रेल्वे स्थानकाला दिली. हिरावतीला उपचारांसाठी विजयपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दीपकला तीन भाऊ, दोन बहिणी आहेत. दीपकच्या निधनाबद्दल कळताच त्याची आई बेशुद्ध पडली. पोलिसांनी दीपकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
तुमचा पती गेला! अंत्यविधी करून घ्या! महिलेचा नकार; एका स्वप्नामुळे २३ वर्षांनी घडला चमत्कार
दाम्पत्याच्या मृत्यूनंतर गावात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. दोघांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. दीपक हिरावतीला कोल्हापुरातून फोन करायचा. मात्र तिचा फोन सतत व्यस्त असायचा. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाल्याची कुजबुज ग्रामस्थांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here