आबिद हे पालीतील काजीसराय येथील राहणारे. दारिद्र्यात वाढलेले. त्यांनी हायस्कूलच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि ५ मार्च १९८८ रोजी लष्करात भरती झाले. आबिद यांना त्यांच्या साहसी कामगिरीसाठी १९९५ मध्ये आर्मी मेडल देण्यात आले होते. १९९५ मध्ये अबिद यांचे लग्न फिरदौस यांच्याशी झाले होते.
पाकच्या १७ सैनिकांना ठार केले
कारगिल लढाईत १ जुलै १९९९ ला पाकिस्तानी सैनिकांविरोधात लढताना आबिद यांच्या पोटा गोळी लागली. पण त्याची परवा न करता त्यांनी आपल्या रायफलीतून १७ पाकिस्तानी सैनिकांना मारलं. यादरम्यान, एक गोळी आबिदच्या गळ्याला लागली आणि ते शहीद झाले.
११ महिन्यांपासून पेन्शन नाही
शहीद आबिद यांच्या पत्नीला दरमहा ७५०० रुपये आणि त्यांच्या सासूला दरमहा ५००० रुपये पेन्शन मिळत असे. पण गेल्या अकरा महिन्यांपासून त्यांना पेन्शन मिळाली नाही, असं त्यांच्या पत्नीने सांगितलं.
वॉर्ड आणि गावच्या शाळेला शहीद आबिद यांचे नाव दिले गेले. शहीद आबिद खान उच्च प्राथमिक विद्यालय असे नाव ठेवण्यात आले. सध्या त्याचा भाऊ नासिर हा आबिद नगर प्रभागाचा नगरसेवक आहे. शाळेच्या मुख्य दारावर लिहिण्या आलेले शहीदाचे नावही रंगवून लपवले गेले. आमदार निधीतून शाळेचे सुशोभीकरण केले गेले. त्यावेळीही शहीद आबिद यांचे नाव गायब केले गेले.
जमिनीवर बांधलेली शासकीय शाळा
आमच्या कुटुंबाच्या जागेवर एक सरकारी शाळा बांधली गेली आहे. या जागेचा ताबा मिळावा यासाठी आम्ही प्रशासनाकडे तसंच संरक्षण मंत्रालयाला पत्र लिहिले. पण कोणतीही कारवाई झाली नाही, असं शहीद आबिद यांच्या भावाने सांगितलं.
भावाची मजार सखल भागात असल्याने थोडाही पाऊस पडला की तिथे पाणी साचतं. यामुळे मजारीचा चबुतरा उंच करण्यासाठी आपण कित्येकवेळा प्रशासनाकडे मागणी केली. परंतु अद्याप कोणीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही, असं शहीद आबिद यांच्या भाऊ नासिर यांनी सा्ंगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times