गंगटोक: प्रजनन दर वाढवण्यासाठी सिक्किम सरकारनं महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. लोकसंख्या वाढवण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यास दुसरं अपत्य झाल्यावर त्याला वेतनवाढ देण्यात येईल. दोनपेक्षा अधिक अपत्य झाल्यावर त्यांना दुप्पट पगारवाढ दिली जाईल. २१ जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या नवजात बालकांच्या देखभालीसाठी चाईल्ड केअर अटेंडंट उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी सांगितलं. सिक्किममधील लोकसंख्या वाढीचं प्रमाण अतिशय कमी आहे. राज्यातील ४० टक्के पुरुषांनी आणि २५ टक्के महिलांनी लग्न केलेलं नाही. राज्यातील प्रजनन दर खालावत चालला आहे. तो वाढवण्यासाठी आता सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
तुमचा पती गेला! अंत्यविधी करून घ्या! महिलेचा नकार; एका स्वप्नामुळे २३ वर्षांनी घडला चमत्कार
आई झाल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना ३६५ दिवसांची रजा मिळेल. तर वडील झालेल्या कर्मचाऱ्याला ३० दिवसांची सुट्टी मिळेल. एखाद्या दाम्पत्याला मुलं होत नसल्यास आयव्हीएफ प्रक्रियेसाठी सरकार अर्थसहाय्य करणार आहे. मुख्यमंत्री तमांग यांनी एका कार्यक्रमात याबद्दलची माहिती दिली. सरकारनं ४० आणि त्यापेक्षा अधिक वर्षांच्या महिलांच्या भरतीचा प्रस्ताव दिला आहे. महिला कर्मचारी बाळंत झाल्यानंतर त्यांची बाळांची काळजी घेण्याचं काम या महिलांकडे असेल. सरकार त्यांना यासाठी महिन्याकाठी १० हजार रुपये देईल.
नवरा-बायकोचा वाद, घर पेटलं; थंड नाश्ता कारण ठरला; पत्नीनं स्वत:ला संपवलं की वेगळंच घडलं?
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार सिक्किममधील प्रजननाचा दर देशात सर्वात कमी आहे. सिक्किमचा प्रजनन दर १.१ आहे. याचा अर्थ सिक्किममधील महिला सरासरी एक मूल जन्माला घालतात. शहरी भागात हेच प्रमाण ०.७, तर ग्रामीण भागात १.३ आहे. राज्य सरकारच्या दृष्टीनं हा चिंतेचा विषय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here