Nashik News : राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या नाशिकच्या (Nashik) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (Nashik Open University) नवी संकल्पना राबवली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी एकाच व्यासपीठावर विद्यापीठाच्या सर्वच सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यापीठाने वायसीएमओयू ई (YCMOU E Suvidha) सुविधा नावाचं ऍप्लिकेशन सुरु केले आहे. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आता प्रवेशित पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच कामकाजगतिशील होण्यासाठी डिजिटल सुविधांच्या उपलब्ध वर दिला आहे. नाशिकपासून शेकडो किमी अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा जास्तीत जास्त वापर होऊ शकेल जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुरू केलेल्या ई सुविधा अ‍ॅपच्याच धरतीवर मुक्तच्या विद्यार्थ्यांसाठी वायसीएमओयुई सुविधा हे मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. ॲप प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यातून विद्यार्थ्यांना प्रवेशासह प्रवेशानंतर ज्या विविध सुविधांची उपलब्धता होणार आहे. त्यामुळे थेट विद्यापीठ किंवा विभागीय उपकेंद्राशी संपर्क साधण्याची ही आता या आवश्यकता राहणार नाही. 15 हजार विद्यार्थ्यांनी हे आतापर्यंत डाउनलोड केले असून लवकर सर्वच विद्यार्थ्यांद्वारे सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी जागृती केले जाणार आहे.

नाशिक मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदविका, पदवी, पदवीत्तर शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. कार्यालयीन प्रणालीचा भाग म्हणून विभागीय कार्यालयांची हे विद्यार्थी संलग्न असतात. परंतु दरवेळी विद्यापीठ किंवा विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयांमध्ये जाणे वेळ खाऊ व खर्चिक होऊन बसते. अशावेळी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या सुविधांचा लाभ घेता यावा या उद्देशाने विद्यापीठामार्फत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आलेला आहे. या अंतर्गत वायसीएमओयु ई सुविधा हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिल्याचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक डॉ. भटू प्रसाद पाटील यांनी सांगितले.

प्लेस्टोअर करा डाऊनलोड… 

दरम्यान गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले हे ॲप्लिकेशन जवळपास पाच एमबी चे असून सध्या पाच लाख विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. यापैकी सुमारे 15 हजार विद्यार्थी त्याचा वापर करत आहेत. लवकरच इतरही विद्यार्थ्यांनाच्या मोबाईल मध्ये हे ॲप्लिकेशन डाऊनलोड झालेले दिसून येईल आणि बहुतांशी सर्व विद्यार्थ्यांद्वारे त्याचा वापर करण्यासाठी विद्यापीठ विद्यापीठाकडून विशेष उपक्रम हाती घेतला जाईल. हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून वापरावे असे आवाहनही विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे.

news reels New Reels

अॅपमध्ये या सुविधा…

दरम्यान अॅपमध्ये वेबसाईटवर उपलब्ध असलेली पीडीएफ स्वरूपातील पुस्तके या द्वारे लिंकवर दिसतील. ॲपद्वारे प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा. प्रवेशानंतरच्या सेवांसाठी पर्याय. कॅलेंडरच्या माध्यमातून वर्षभरातील नियोजनाची माहिती प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे. आपली प्रोफाइल पाहण्याची सुविधा. पेपरची माहिती मिळवण्याचा उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी बघणे सुलभ होणार असून परीक्षेचे वेळापत्रक प्राप्त पर्याय देखील ऍप्लिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here