Nashik News : नाशिकसह (Nashik) त्र्यंबकेश्वर यामध्ये येऊ घातलेल्या सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका (Nashik NMC) प्रशासन जय्यत तयारी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात तब्बल तीनशे कोटी रुपयांचे रिंग रोड साकारले जाणार आहे. यासाठीच्या निधीची पूर्तता झाल्यानंतर कामाला सुरवात होणार आहे.
दर बारा नाशिकसह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) शहरात सिहंस्थ कुंभमेळा भरतो. मात्र अशावेळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच वाहतूक कोंडीतून नाशिककरांची सुटका करण्यासाठी नव्या रिंगरोडची निर्मिती केली जाणारा आहे. यापूर्वीच बाह्य रिंगरोड केला जाणार असल्याचे निश्चित झाले असताना आता शहरांर्गत रिंग रोड साकारला जाणार आहे. यासाठी तीनशे कोटी निधीची तरदूत महापालिकेला करावी लागणार असून याबाबतचे बारकाईने निरीक्षण सुरु आहे. कुंभमेळ्यात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बाह्य रिंगरोडसोबतच शहरात अंतर्गत रिंग रोड केले जाणार आहे. दरम्यान नवीन इनर रिंगरोड विकसित करणे व काही ठिकाणी जुन्या रिंगरोडची रुंदी वाढवताना जवळपास दहा हजार वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा (Kumbhmela) पाच वर्षांवर येऊन ठेपला असून महापालिकेकडून युध्दपातळीवर दळणवळणासह सर्वच अत्यावश्यक सुविधा उभारण्यासाठी बारकाईने नियोजन सुरु केले आहे. तब्बल दहा हजार कोटीं खर्चून साठ किमी चा बाह्यरिंग केला जाणार आहे. बाह्यरिंग रोड बरोबरच शहरात 190 किलोमीटरचे इनर रिंगरोड विकसित केले जाणार अाहे. कुंभमेळ्यात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बाह्य रिंगरोडसोबतच शहरात अंतर्गत रिंग रोड केले जाणार आहे. दरम्यान नवीन इनर रिंगरोड विकसित करणे व काही ठिकाणी जुन्या रिंगरोडची रुंदी वाढवताना जवळपास दहा हजार वृक्षांवर कुर्हाड चालवावी लागणार आहे. बांधकाम विभाग उद्यान विभागामार्फत हे सर्वेक्षण करणार आहे.
त्याचबरोबर हा रिंगरोड साकारण्यापूर्वी कायदेशीर सल्ला देखील घेतला जाणार असल्यानं त्याद्वारे इनर रिंगरोडचा मार्ग सुखरुप होईल. इनर रिंगरोड विकसित करण्यासाठी तीनशे कोटींचा खर्च येणार आहे. या प्रस्तावित रिंगरोडचा संपूर्ण आराखडा तयार करण्याच्या हालचाली बांधकाम विभागाने सुरु केल्या आहेत. महापालिकेने मागील सिंहस्थात नव्वद किलोमीटरचा अंतर्गत रिंगरोड विकसित केले होते. त्यामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात हालका झाला होता. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी महापालिकेने सुरु केली आहे.यासाठी तीनशे कोटींचा खर्च अपेक्षित असून महापालिका बांधकाम विभाग लवकरच त्यावर काम सुरु करुन राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी केली जाणार आहे.
New Reels
असे असतील इनर रिंग रोड
नाशिक – पुणे, नाशिक – मुंबई, दिंडोरी रोड, पेठ रोड, त्र्यंबकेश्वर मार्ग, नाशिक – औरंगाबाद या राष्ट्रीय व राज्य महामार्गांशी शहरातून जाणारे इनर रिंगरोड जोडले जातील. जेणेकरुन सिंहस्थकाळात शहरात वाहनांची गर्दीमुळे वाहतूक यंत्रणा कोलमडणार नाहीं. या मॉडेलमुळे पालिका तसेच पोलीस प्रशासन विभागाला मोठी मदत होणार आहे.
So far, quantum Ai is a fantastic experience. Іt’s my fiгst tume using
bots, wһich is ցreat, and Quangum Ai makes іt easy. Ⲟne thing tһat could bbe improved іѕ allowing tօ
invest іn fiat currency bսt otherԝise, the app is gгeat!