Dhananjay desai : कदाचित तुम्ही पवार नसाल, पण छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच होते. अशा शब्दात हिंदू राष्ट्रसेनेचे प्रमुख धनंजय देसाई (Dhananjay desai) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली.  आज पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचं (Hindu Janakrosh Morcha) आयोजन करण्यात आलं. त्यात धनंजय देसाई  सहभागी  झाले होते. मोर्चातील भाषणात त्यांनी अजित पवारांवर चांगलीच फटकेबाजी केली आहे. 

धनंजय देसाई म्हणाले की, संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते म्हणणारे शाहिस्तेखान, अफजल खान यांच्या कुळातलेच असावेत. धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले आहेत, असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांने कितीही वेळा शेतीची मशागत केली आणि नांगर फिरवला तरीदेखील शेतात कॉंग्रेस उगवतच त्यामुळे कॉंग्रेसला खुरपावंच लागतं. आदिलशाहीचा नांगर फिरवला तो बारामतीपर्यंत गेला. तिथं ही पिलावळ जन्माला आली. भगव्याची शपथ घेऊन सांगतो आम्हाला पक्षाच्या लंगोट नेसायच्या नाहीत. आम्हाला काशी विश्वनाथाचा परम पूज्य भगवा ध्वजाचा अभिमान आहे. हा आमच्या पितृदेवतांचा ध्वज आहे. त्यामुळे याचा अपमान करणाऱ्या राजकीय आणि दृष्ट राजकीय व्यवस्थेला कोणीही क्षमा करु नका, असा भाषेत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

‘होय मी धर्मवीरच’चे विविध बॅनर्स…

होय मी धर्मवीरच! गो हत्या मुक्त पुणे, फाल्गून अमावस्या अर्थात धर्मवीर दिन, लव जिहाद मुक्त पुणे, असे फलक घेऊन विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. तर या मोर्चात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या. या मोर्चात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. त्यासोबतच तरुणांचा देखील मोठा सहभाग दिसला. हजारोंच्या संख्येत अनेक संघटनांचे कार्यकर्ते देखील हातात भगवे आणि डोक्यावर टोपी परिधान करुन सहभागी झाले होते.
 

news reels New Reels

अनेकांचा सहभाग…

आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा यात विशेष सहभाग झाले होते. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळेदेखील या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात महिला आणि युवकांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसला. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन झालं. विश्व हिंदू परिषदचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्निल नाईक, श्री शंभू चरित्र अभ्यासक नीलेश भिसे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे सहभागी झाले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here