Nashik News : नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) उमेदवारांचा प्रचार दौरे सुरु आहेत. अशातच दोन प्रमुख उमेदवार असलेले शुभांगी पाटील (Shubhangi Patil) आणि सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे आज समोरासमोर आले. मात्र या दोघांनीही एकमेकांना कानाडोळा करत निघूनही गेले. अहमदनगर जिल्ह्यातील एका शाही विवाहसोहळ्याला या दोन्ही उमेदवारांनी हजेरी लावली, त्यावेळी हा प्रसंग घडला. 

नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत सध्या टशन पाहायला मिळत असून उमेवारांचा प्रचार जोरदारपणे सुरु आहे. यात शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. अशातच हे दोघे एकाचवेळी एकाच ठिकाणी समोरासमोर आले, मात्र एकमेकांशी बोललेही नाहीत. निमित्त होते, माजी मंत्री शकंरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या मुलाच्या विवाह सोहळा. गडाख यांचे पुत्र उदयन गडाख आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या निवेदिता यांचा विवाह सोहळा आज नेवासामध्ये पार पडला. यावेळी शरद पवार, आदित्य ठाकरे, राधाकृष्ण विखे, शरद पवार आदींची लग्नसोहळ्याला उपस्थिती लावल्याचे दिसून आले. याच लग्न सोहळ्यात दोन उमेदवाराची भेट झाली, मात्र  या दोघांमध्ये संवाद झाला नाही, दोघांनीही मौन पाळत विवाह सोहळ्यातून काढता पाय घेतला. 

नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे तर सत्यजित तांबे यांना अनेक शिक्षक संघटनासह राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे. सध्या या दोघांत नाशिक पदवीधरची लढत होणार हे निश्चित आहे. त्यामुळेच माघारीचा दिवस संपल्यानंतर मतदारसंघात दोघेही उमेदवार प्रचार दौरे करत आहेत. अशातच आज अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांच्या मुलाचा विवाह चंद्रशेखर घुले यांची कन्या निवेदिता हिच्याशी पार पडला. या सोहळ्यात अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. या लग्नात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार शहाजी बापू पाटील आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

दरम्यान या सोहळ्याला उमेदवार सत्यजित तांबे यांनी हजेरी लावली. त्यांनी उभयतांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडत असताना त्याचवेळी उमेदवार शुभांगी पाटील या लग्नस्थळी पोहोचल्या. विवाहसोहळ्याच्या प्रवेशद्वारावरच या दोघांची समोरासमोर भेट झाली. मात्र एकमेकांसमोर येऊन काहीच बोलले नाहीत. दरम्यान दोन्ही उमेदवार दिवसरात्र एक करून करून मदारसंघात फिरत आहेत. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने घरोघरी जाऊन प्रचार सुरु आहे. 

news reels New Reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here