Nagpur ZP News : नागपूर जिल्हा परिषद प्रशासनाने गैरप्रकारांना आळा बसावा, तसेच कर्मचाऱ्यांची विभागातील मक्तेदारी कमी व्हावी, यासाठी तीन वर्षाहून अधिक काळापासून एकाच टेबलवर कार्यरत कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. परंतु काही विभागप्रमुखांनी मर्जीतील कर्मचाऱ्यांची बदली केली; पण टेबल जुनाच कायम ठेवला असल्याची माहिती आहे. या प्रकरणाची जिल्हा परिषद वर्तुळात जोरदार उलटसुलट चर्चा सुरु आहे.

जिल्हा परिषदेच्या (Nagpur ZP) पारशिवनी पंचायत समितीत पेन्शन घोटाळा उघडकीस आला. यातील सूत्रधार महिला कर्मचारी सरिता नेवारे एकाच टेबलवर आठ वर्षापासून ठाण मांडून होत्या. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तीन वर्षाहून अधिक कालावधीपासून एकाच टेबलवर कार्यरत कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात बदलीच्या नावाखाली काहींचा टेबल बदलण्यात आला. परंतु काम जुनेच करीत असल्याची माहिती आहे. तर काही विभागात अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी आपला टेबल सोडण्यास तयार नाही. काही विभागात पद व अधिकारापेक्षा कोणता टेबल कुणाकडे आहे. याला अधिक महत्त्व आहे. यावर ‘अर्थपूर्ण ‘व्यवहार अवलंबून असल्याचं बोललं जातं. यातूनच पारशिवनी पंचायत समितीत पेन्शन घोटाळा घडला होता. या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असतानाही बदल्यांची औपचारिकता पूर्ण केली जात आहे. प्रशासनाने याला आळा घालण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.

विभागनिहाय फेरआढाव्याची गरज जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत कर्मचारी किती वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. याचा विभागनिहाय फेरआढावा घेण्याची गरज आहे. तीन वर्षाहून अधिक कालावधीपासून एकाच टेबलवर असलेल्या कर्मचाऱ्यांची तातडीने उचलबांगडी करण्याची गरज आहे.

मुख्य आरोपीकडून 70 लाखांची जप्ती

news reels New Reels

नागपूर जिल्हा परिषदेच्या पारशिवनी पंचायत समितीच्या पेंशन घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 30 बोगस खाती समोर आली आहेत. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून (Economic Offenses Wing) 24 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. घोटाळ्यातील मुख्य आरोपी महिला कर्मचारी सरिता नेवारेसह खैरकर नामक लेखाधिकारी यालाही अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत आणखी काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पोलिसांनी मुख्य सूत्रधार सरिता नेवारे हिच्याकडून सोन्याचे दागिने, फर्निचर, ट्रक, स्कार्पिओ कार जप्त केली आहे. हा मुद्देमाल 60 ते 70 लाख रुपयांच्या घरात आहे.

ही बातमी देखील वाचा…

नागपुरात उड्डाणपुलावर आणखी एक अपघात ; अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चिरडले

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here