Pune Crime news :  पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. उस्मानाबादहून मुंबईला दोन टन गोमांस घेऊन जाणारा टेम्पो खडकी पोलिसांनी जप्त केला (Pune crime) आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर खडकी जकात नाका या परिसरात ही करावाई केली आहे. उस्मानाबादहून मुंबईला दोन टन गोमांस घेऊन हा ट्रक जात होता. या प्रकरणी खडकी पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली.

सय्यद सोहेब अजीज (वय 37, रा. वाशी, नवी मुंबई), तन्वीर अहमद कुरेशी (वय 42, रा. वाशी, नवी मुंबई), शौकत हमीद कुरेशी (वय 35, रा. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत २७ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद येथून एका टेम्पोत दोन टन गोमांस घेऊन काहीजण मुंबईकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  खडकी त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या पथकाने जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर सापळा रचण्यात आला. खडकी जकात नाका परिसरात संशयित टेम्पो पोलिसांच्या पथकाने अडवला. पोलिसांनी या टेम्पोची पाहणी केली. त्यावेळी टेम्पोत गोमांस आढळून आले. पोलिसांनी आरोपींसह टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोतील सय्यद अजीज आणि तन्वीर कुरेशी यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते गोमांस घेऊन मुंबईला जात असल्याचे उघडकीस आलं. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सापळा रचून पकडला टेम्पो…

या सगळ्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस सतर्क झाले होते. त्यानुसार त्यांनी  मुंबई-पुणे रस्त्याची व्यवस्थित पाहणी केली आणि सापळा रचला. सापळा रचून टेम्पो ताब्यात घेतला. या टेम्पोत चक्क दोन टन गोमांस होतं. टेम्पोसह गोमांस पोलिसांनी जप्त केलं आहे. 

news reels New Reels

पुणे पोलिसांच्या धडाधड कारवाया

पुणे पोलिसांनी याआधीदेखील अशा कारवाया केल्या आहेत. 31 डिसेंबरला राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी 7 जणांना अटक केली होती. त्यांच्या जवळील मुद्देमालासह एक चार चाकी गाडी देखील जप्त केली होती. या कारवाईत तब्बल 2000 हून अधिक दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुण्यातील नवले ब्रीज आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here