Ncp Vs Shinde Group: मागच्या काही दिवसांपासून परभणीत शिंदे गटामध्ये (Shinde Group) जाणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि यावरूनच राष्ट्रवादीचे (NCP) आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) नेते सईद खान यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुन्हेगारांना शिंदे गटात प्रवेश देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. तर दुसरीकडे बाबाजाणी यांच्यावरच 41 गुन्हे दाखल आहेत आणि तेच शिंदे गटात येण्यासाठी अर्जुन खोतकर यांना भेटून धडपड करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या गटाचे नेते तथा भावना गवळी (bhavan gavali) यांच्याशी कथित ईडी घोटाळ्यात अटक करण्यात आलेले सईद खान यांनी मागच्या काही दिवसात जिल्ह्यातील आणि विशेषतः पाथरी येथील नगर परिषदेचे माजी सदस्य तसेच ग्राम पंचायतचे सरपंच यांना शिंदे गटात आणण्याचा धडाका लावलाय. यातील अनेक जण हे  राष्ट्रवादी आणि बाबाजानी समर्थक असल्याने या प्रवेशावर आक्षेप घेत राष्ट्रवादीचे (NCP) आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष करत मुख्यमंत्री ईडीतील आरोपी तसेच वाळू माफिया आणि इतर गुन्हे असलेल्या लोकांना प्रवेश देत असल्याचा आरोप केला आहे. 

तसेच आपण मुख्यमंत्र्यांना याबाबत भेटून सर्व सांगणार असल्याचे ही बाबाजानी दुर्राणी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यावर शिंदे गटाचे नेते सईद खान यांनीही पत्रकार परिषद घेत बाबाजानी आणि त्यांच्या कुटुंबावर एकूण 41 गुन्हे दाखल असल्याची यादी दाखवली. बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरीत अनेक घोटाळे केले आहेत. त्याची चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे बाबाजानी दुर्राणी एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत आहे. दुसरीकडे अर्जुन खोतकर यांना भेटून शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी धडपड करत आहेत असा आरोपही सईद खान यांनी या पत्रकार परिषदत केलाय. त्यामुळे येत्या काळात शिंदे गटाचे नेते सईद खान आणि राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाची बातमी: 

news reels New Reels

Pension Scheme: जुनी पेन्शन योजना लागू झाली तर तिजोरीवर 55 हजार कोटींचा अतिरिक्त भार, ‘क’ वर्ग कर्मचाऱ्यालाही मिळणार 30 हजारांची पेन्शन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here