Pune Crime News : पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या काकानेच 2 अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील भवानी पेठेत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका समाजसेविकेने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. इरफान आतिक (29) आणि मोहम्मद धोबी (40) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार गेल्या 20  ते 22 दिवसांपासून सुरू होता. यातील एका पीडित मुलीचे वय 14 असून दुसऱ्या पीडित मुलीचे वय 10 असून त्या दोघी बहिणी आहेत. या दोन्ही मुलींचे आई-वडील काही कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. मुली लहान असल्या कारणाने त्यांनी या दोघींना काकाकडे राहिला पाठवले होते. दरम्यान घरी असताना काकाने वेळोवेळी या दोन्ही लहान मुलींशी बळजबरी करून शारीरिक संबंध ठेवले. 

काका आणि मित्रानेही केला बलात्कार

त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. यावरच हा नराधम थांबला नाही तर त्याच्या मित्रानेसुद्धा या दोन्ही मुलींशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. गेल्या तीन आठवड्यांपासून हा प्रकार सुरू होता. या घटनेनं सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. हा सगळा प्रकार एका समाजसेविकेने पोलिसांना सांगताच पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीचा शोध घेतला आणि यातील दोघही जणांना अटक केली आहे. खडक पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात बलात्काराच्या गुन्ह्यासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

21 दिवस बलात्कार केला

दोघांनी मिळून एक दोन नाही तर तब्बल 21 दिवस हा संतापजनक प्रकार केला. यातील एका मुलीने पोटात दुखत असल्याने शेजारी राहत असलेल्या लोकांना सांगितलं आणि यातूनच आज सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली आहे तर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

news reels New Reels

अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ

चार दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती.  लग्नाचं आमिष दाखवून राहत्या (Pune crime) घरात खेळण्याच्या बहाण्याने तेरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता 13 वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचं लक्षात आल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. पुण्यातील वानवडी परिसरात ही घटना घडली होती.जानेवारी 2022 ते जून 2022 मध्ये हा सगळा प्रकार घडला होता. ओळखीच्या 19 वर्षीय तरुणाने 13 वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर सहा महिने लैंगिक अत्याचार केले होते. या दरम्यान मुलीला गर्भधारणा झाली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here