Thane Crime News : कपड्यांच्या आडून बनावट विदेशी मद्याची (Foreign Liquor) तस्करी करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने (State Excise Department) पर्दाफाश केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या छापेमारीत कल्याण-पडघा मार्गावरील एका गोदामासह कल्याणमध्ये उभ्या असलेल्या एका बीएमडब्लू कारमधून लाखोंचा विदेशी मद्याचा साठा जप्त केलाय. याबरोबरच गोदाम सील करून बीएमडब्लू कार जप्त केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हनुमंत दत्तू ठाणगे (वय, 62) आणि संदीप  रामचंद्र दावानी (वय, 34 ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बीएमडब्लूचा मालक आणि या टोळीचा मोरक्या  दिपक  जियांदराम  जयसिंघानी हा फरार आहे. 

Thane Crime News :  ‘असं’ उघड पडलं पितळ 

कल्याण-पडघा मार्गावरील देवरुंग गावातील एका गोदामात बनावटी विदेशी मद्याचा साठा लपवून ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराने दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार  भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाच्या पथकासह भिवंडी आणि उल्हासनगर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई केली. संयुक्त कारवाईत दारूसाठी लपवून ठेवलेल्या गोदामावर छापेमारी केली. यावेळी गोदामात साठा केलेले दमण आणि हरीयाणा राज्य निर्मित तसेच महाराष्ट्र राज्यातील बनावट मद्याच्या साठ्याचे 266 बॉक्स जप्त करण्यात आले.

या छापेमारीनंतर तपास पथकाने  कल्याण पश्चिम भागातील एका हायप्रोफाईल सोसायटीच्या पार्किंगमध्ये  छापा टाकून त्या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बीएमडब्लू  कारमधून दमण राज्य निर्मित विदेशी मद्याचे  25 बॉक्स जप्त करण्यात आले. या दोन्ही छापेमारीत 291 बॉक्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. दोन्ही कारवाईत 56 लाख 75 हजार 640 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर तिघांवर  महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ), (ई), 81, 83, 90 आणि 108 अन्वये गुन्हा  दाखल करण्यात आला.

छापेमारीत जप्त केलेला मुद्देमाल हा जुन्या कपड्यांच्या गोण्यामध्ये लपवून महाराष्ट्रात आणल्याचे उघडकीस आले आहे. तसेच फरार आरोपी दिपक जियांदराम जयसिंघानी याच्या नावे मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये वाईन शॉप  असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.  

news reels reels

महत्वाच्या  बातम्या 

Aurangabad News: शिवीगाळ करणारा मित्र डोक्यात बसला, म्हणून धारदार दगडाने मुंडके धडावेगळे करत त्याचा जीवच घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here