Who is Kunal Tilak : पुण्यात कसबा (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका (Bypoll election) जाहीर झाल्या. 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी अनेकांनी कंबर कसली आहे. परंपरागत भाजपचा असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे. यात त्यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळकांनी देखील  घरातच उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. शैलेश टिळक (Shailesh Tilak) राजकारणात फारसे सक्रिय नाहीत त्यामुळे मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाल टिळकची (Kunal Tilak) सध्या चर्चा रंगली आहे. 

कुणाल टिळक हा आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा आहे. मागील काही वर्षांपासून ते पुण्यातील राजकारणात सक्रिय आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे भाजप युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे. तरुण आणि राजकारणात सक्रिय असल्याने त्यांच्या नावाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. युनिव्हर्सिटी ऑफ स्टरॅथक्लायेद, इंग्लंडचा विद्यार्थी राजदूत म्हणून त्यांनी काम केलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मासिक संपादकीय समिती सदस्य म्हणून ते कार्यरत आहे. 

शिक्षण किती?

कुणाल यांचं शिक्षण पुण्यातील एस पी महाविद्यालयातून झालं आहे. त्यानंतर त्याने पुणे विद्यापीठातून बीबीएची डिग्री घेतली आहे. त्याशिवाय त्यांनी एल. एल. एम आंतरराष्ट्रीय संबंध, कायदे आणि सुरक्षा युनिव्हर्सिटी ऑफ स्टरॅथक्लायेद, इंग्लंडमधून पूर्ण केलं आहे. शिक्षण आणि तरुणांचे प्रश्न यावर त्यांचा जास्त भर आहे.

news reels New Reels

आईमुळे राजकारणात…

मागील 20 वर्ष मुक्ता टिळकांनी महिला आमदार म्हणून नावलौकिक मिळवला. कॅन्सर सारख्या आजारानं ग्रासलं असतानादेखील त्या कार्यरत होत्या. मागील दोन वर्षात त्यांची प्रकृती जास्तीच खालावली होती. त्यामुळे आईच्या कामाचा भार हलका करण्यासाठी कुणाल यांची प्रयत्न केले. मतदार संघाचा अभ्यास केला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  आपला मुलगा आपल्याच पावलावर पाऊल ठेवून सक्रिय व्हावा, अशी मुक्ता टिळकांची देखील इच्छा होती.  

तरुणांच्या प्रश्नांवर काम करण्याला प्राधान्य

सध्याची पीढी राजकारणाला करियर म्हणून पाहत नाही त्यामुळे तरुणांचे अनेक प्रश्न सुटत नाहीत. त्यांचा प्रतिनिधी तरुण असला की प्रश्नही सारखे असतील आणि त्यावर उपाय शोधणंही सोपं होईल, असं कुणाल सांगतात.  संधी मिळाली तर तरुणांच्या प्रश्नांवर काम करायला आवडेल, सध्या बेरोजगारी आहे. तरुणांचं मानसिक आरोग्यचा देखील महत्वाचा विषय आहे. त्यावर काम करण्याला प्राधान्य असणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुक्ता टिळकांनी केलेलं काम समोर असंच सुरु ठेवायचं आहे, असंही ते म्हणाले. त्यांच्या नावाची सध्या उमेदवारीसाठी चर्चा आहे त्यांना जर उमेदवारी दिली तर पुण्याला तरुण आणि तडफदार लोकप्रतिनिधी मिळू शकतो.

1 COMMENT

  1. An excellent trading platform. Тһe bot tһаt trades witһ tr ding ᧐ffers incredible features іt
    cаn perform with a ⅼittle tweaking every noԝ and tһеn, but
    tһey аre Quantum Ai team is makinng enhancements.
    Ӏ’ve been trading for oone year annd have groan my portfolio sinche tһrough tһe usе of bots trading.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here