मुंबई: फक्त सहा महिन्यांच्या काळात हे मुख्यमंत्री म्हणून नुसते लोकप्रिय ठरले नाहीत तर देशात अव्वल नंबर पटकावून पुढे आले. गंभीर विषयाचा, शत्रूचा अभ्यास करायचा व मगच घाव घालायचा या पक्क्या तयारीनेच ते मैदानात उतरतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले सर्व राजकीय विषाणू उडून धुळीतून वाहत गेले, असं सांगतानाच फालतू बडेजाव मिरवणाऱ्यांपैकी हा माणूस नाही, अशा शब्दात शिवसेनेने यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून अग्रलेख लिहिण्यात आला आहे. या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत. सह्याद्रीच्या टोकदार अभेद्य कड्याप्रमाणे त्यांचे नेतृत्व आज देशाचे शक्तिस्थान ठरले आहे. सह्याद्रीच्या कडय़ाने आता हिमालयाचे नेतृत्व करण्यासाठी पुढची चाल करावी. ‘साठी’ ही सुरुवात आहे, मोठ्या राजकारणाचा आरंभ आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज साठाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वाढत्या वयाबरोबर शहाणपण येते असे म्हणतात. ते पूर्ण सत्य नाही. ते शहाणे होतेच. वय हे फक्त निमित्त ठरले.

>> आम्ही उद्धव ठाकरे यांना अनेक वर्षे ओळखतो. त्यांच्या स्वभावाचे, कार्यपद्धतीचे अनेक कंगोरे आम्हाला माहीत आहेत. मोठ्या पदावर विराजमान झाला म्हणून फालतू बडेजाव मिरवणाऱ्यांपैकी हा माणूस नाही याची आता महाराष्ट्राला खात्री पटली असेल.

>> ‘कोविड-१९’सारखे संकट साधे नाही. जग गिळायला निघालेले हे संकट. त्याच कोविडच्या जबड्यात हात घालून ते लढत आहेत, कठोरपणे निर्णय घेत आहेत. निर्णय एकदा घेतला की, माघार नाही हे त्यांचे धोरण.

>> महाराष्ट्रात तीन पक्षांचे आघाडी सरकार सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी हे तीन पक्ष एकमेकांचे कडवट विरोधक होते. काँगेस, राष्ट्रवादी टोकाचे धर्मनिरपेक्ष तर ज्वलज्जहाल हिंदुत्ववादी, पण भारतीय जनता पक्षाच्या ‘फेकू’ व ‘खंजीर’छाप राजकारणास धडा शिकवायचा या हेतूने भिन्न विचारांचे तीन पक्ष एक झाले व राज्यात महाविकास आघाडीचा पाळणा हलवला.

>> ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे सरकार पंधरा दिवसही चालणार नाही व उद्धव ठाकरे यांना सरकार चालवणे जमणार नाही, असे दावे ठोकणारे आता थंड पडले. कारण संकटांशी लढा देत सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला व अडथळे पार करीत ते पुढे चालले. याचे श्रेय ठाकरे नावाचे वलय व सर्वसमावेशक स्वभावाला द्यावे लागेल.

>> ‘कोविड-१९’चे संकट हे साधे नाही. या संकटाचा आणि विषाणूचा खोलवर अभ्यास त्यांनी केला. तो इतका की, अनेक नामवंत डॉक्टरांचे ज्ञान त्यापुढे तोकडे पडले. ‘कोविड-१९’ हा विषाणू मानवाचा शत्रू आहे. त्यामुळे शत्रूचे बारकावे काय याचा अभ्यास करून लढाईत उतरायचे हा त्यांचा स्वभाव असल्यानेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी जी ‘War Against Virus’ म्हणजे विषाणूविरुद्ध लढाई पुकारली, ती रोमांचक आहे. या युद्धाचे व ठाकरे यांच्या नेतृत्वकौशल्याचे जगाने कौतुक केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here