म. टा. वृत्तसेवा, : मिरा-भाईंदरच्या अपक्ष () यांच्या नावाने सोशल मीडियावर एक बनावट ऑडिओ क्लिप () व्हायरल करण्यात आली आहे. या क्लिपमध्ये संशयित रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे ठरविण्याचा धंदा सरकारी व खासगी रुग्णालयांकडून सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बनावट ऑडिओ क्लिपप्रकरणी गीता जैन यांनी नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला () अटक करण्यात आली. शुक्रवारी या महिलेला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

मिरा-भाईंदर () शहरातील करोनारुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आमदार गीता जैन यांची एक बनावट ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘करोनारुग्णांच्या उपचारासाठी केंद्र सरकारने प्रति रुग्ण दीड लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यासाठी खासगी प्रयोगशाळा व डॉक्टरांना जास्तीत जास्त नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे ठरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,’ असा आरोप या क्लिपमध्ये करण्यात आला होता.

तसेच, सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने त्रस्त रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे ठरवून रुग्णालयात दाखल करण्याचा धंदा सुरू असल्याचे म्हटले होते. या बनावट ऑडिओ क्लिपप्रकरणी आ. गीता जैन यांनी भाईंदरच्या नवघर पोलिस ठाण्यत १७ जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी नवघर पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रंजू झा यांना अटक करून शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती नवघर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत पाटील यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here