Maharashtra Politics news | नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज वेगवेगळे ट्विस्ट घडत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागलं आहे. याठिकाणी शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे. सत्यजीत तांबे अपक्ष निवडणूक लढवत असले तरी त्यांच्या पाठिशी भाजपचे अदृश्य हात आहेत. तर शुभांगी पाटील यांच्या पाठिशी महाविकास आघाडीची ताकद आहे.

हायलाइट्स:
- नाशिकमधील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत
- अगदी शिवसेनेचे कार्यकर्तेही माझ्यासोबत आहेत
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. यामध्ये तांबे पितापुत्रांनी शेवटच्या क्षणी काँग्रेस पक्षाला धक्का दिल्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेस पक्षाने या निवडणुकीसाठी डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून ऐनवेळी माघार घेतली होती. त्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर सत्यजीत तांबे यांनी भाजपसह अन्य राजकीय पक्षांकडे पाठिंबा मागितला होता. तांबे पितापुत्रांच्या या खेळीने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता. यानंतर काँग्रेस पक्षाने सुधीर तांबे यांना तात्पुरत्या कालावधीसाठी तर सत्यजीत तांबे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे सत्यजीत तांबे भाजपच्या आणखी जवळ गेल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसांमध्ये भाजपकडून सत्यजीत तांबे यांना उघडपणे पाठिंबा दिला जाणार का, हे पाहावे लागेल.
सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांच्या पाठिशी ताकद उभी केली आहे. शुभांगी पाटील अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांना भेटायला गेल्या होत्या. थोरात यांच्या संगमनेर येथील घरी शुभांगी पाटील गेल्या होत्या. परंतु, थोरात कुटुंबीय मुंबईत असल्याने शुभांगी पाटील यांना माघारी परतावे लागले होते. यावेळी शुभांगी पाटील यांना थोरातांच्या बंगल्याच्या आवारातही प्रवेश मिळाला नाही, त्यांना सुरक्षरक्षकांनी प्रवेशद्वारावरुनच माघारी धाडले.
सत्यजीत तांबेंवरील कारवाईवरुन काँग्रेस पक्षात दोन गट
सत्यजीत तांबे यांच्यावर यांना पाठिंबा द्यायचा की नाही, या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षातच दोन गट निर्माण झाले आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी तांबेंना पाठिंब्याची भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर बाळासाहेस साळुंखे यांना काँग्रेस पक्षाने नोटीस पाठवली होती. तर दुसरीकडे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.