तिरुअनंतपुरम: केरळमध्ये एका भीषण अपघातात इस्रोच्या पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास अलप्पुझाजवळ कारला अपघात झाला. कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी कार एका ट्र्रकला धडकली. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर रुग्णालयात नेत असताना एकाचा मृत्यू झाला. मृतांमधील सगळ्यांचं वय २४ ते ३० वर्षांच्या दरम्यान आहे.

अपघातात कारचं प्रचंड नुकसान झालं. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढले. त्यासाठी कार कापावी लागली. अपघातात मृत पावलेले कर्मचारी इस्रोच्या कँटिनमध्ये काम करायचे. पाच जणांपैकी चार जण तिरुअनंतपुरमचे होते. तर एक जण अलप्पुझाचा रहिवासी होता. अलप्पुझामध्ये एका कार्यक्रमासाठी पाच जण निघाले होते. प्रसाद, मनु, अमल, सुमोद आणि शिजिन अशी मृतांची नावं आहेत.
लुडो खेळताना पाकिस्तानी तरुणी भारतीयाच्या प्रेमात, नेपाळमधून एंट्री; आता प्रेमकहाणीत ट्विस्ट
अलप्पुझाजवळ असलेल्या अंबालापुझा येथे कारला अपघात झाला. विरुद्ध दिशेनं येत असलेल्या ट्रकला कार जोरदार धडक दिली. कारमधून प्रवास करणारे पाचही जण तिरुअनंतपुरममधील इस्रोच्या कँटिनचे कर्मचारी होते. एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ते अलप्पुझाला जात होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील पाचही जणांचा मत्यू झाला. यानंतर पोलिसांनी ट्रकचा चालक आणि क्लीनरला अटक केली.
रात्री जेवून सगळे झोपले; पती अचानक उठला, पत्नीदेखील मागोमाग गेली अन् सगळेच संपले
कार अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात नेत असताना एकानं अखेरचा श्वास घेतला. पाचही जणांचे मृतदेह अलप्पुझा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर ते त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here