Maharashtra Politics | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. माजी शिवसैनिक असलेल्या नारायण राणे यांनीही ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी नारायण राणे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

 

Narayan Rane and Balasaheb Thackeray
नारायण राणे आणि बाळासाहेब ठाकरे

हायलाइट्स:

  • बाळासाहेबांच्या निधनाचं वृत मी टेलिव्हिजनवर पाहिलं
  • माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने राजकीय क्षेत्रातील मान्यवर बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या केंद्रात भाजपचे मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी आज सकाळीच ट्विट करून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. नारायण राणे यांनी एक दोन पानी पत्रक शेअर केले आहे. यामध्ये नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा शिवसेनेतील प्रवास, मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द, बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांमध्ये झालेली मनाची घालमेल, अशा सर्वच विषयांवर भाष्य केले आहे.

नारायण राणे यांनी आपले राजकीय गुरु असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले आहे की, मला स्वतःला साहेबांचं खूप प्रेम मिळाले. त्यानी माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. मी आज जो आहे तो त्याच्यामुळे आहे है कबूल करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही माझ्या राजकीय यशात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आदरणीय बाळासाहेबांच्या निधनाचं वृत मी टेलिव्हिजनवर पाहिलं. माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या कितीतरी सणांच्या आठवणीनं माझे डोळे ओलावले होते, असे नारायण राणे यांनी म्हटले.
शाळेतील गणित आणि मराठीचा टॉपर विद्यार्थी, पेपरची लाईन टाकायला १५ रुपये पगार; नारायण राणेंची संघर्षगाथा
शेवटच्या दिवसात बाळासाहेब ठाकरे यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मला वाटलं ते याही वेळेस मृत्यूला चकवून बरे होतील. बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बरी नसताना मला त्यांना भेटायचे होते. पण ते करता येत नसल्याने मी प्रचंड अस्वस्थ होतो. त्यांना शेवटचं पाहण्याची संधी मला मिळू शकली नाही. आणि ते आपल्यातून निघून गेले. साहेबा मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा, असे भावूक उद्गार नारायण राणे यांनी काढले आहेत.

मी घेतल्या निर्णयामुळे बाळासाहेबांना यातना झाल्या: नारायण राणे

पक्ष चालवताना बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षाच्या माणसावर ते प्रेमाचा जो वर्षाव करीत आणि जो विश्वास दाखवीत. त्यामुळे ती माणस त्याच्यासाठी जिवावर उदार व्हायलाही मागेपुढे पहात नसत. ते आपल्या माणसांची नेहमीच काळजी घेत आले होते. दुःखाच्या प्रसंगी ते विचारपून करायला ते कधीही विसरले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी मला माझ्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम दिले. मी घेतलेल्या निर्णयानं त्यांना खूप यातना झाल्या असणार आणि त्याबद्दल मला आजन्म दुःख राहणार आहे. पण त्या परिस्थितीत माझा नाईलाज होता. काही लोकांच्या मुळ मला तो निर्णय घेणे भाग पडले. असो. आता त्याबद्दल बोलून काही फायदा नाही, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here