Nashik Shubhangi Patil : नाशिक (Nashik Graduate Constituency) पदवीधर मतदारसंघाच्या मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचाराचा जोरदार धडक सुरू असून संपूर्ण मतदारसंघ त्या पिंजून काढत आहेत. अशातच काल अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) आणि शुभांगी पाटील यांची समोरासमोर यावेळी शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना हात जोडले होते. हात जोडण्याचे कारण शुभांगी पाटील यांनी सांगितले आहे.

शिर्डी जवळील नेवासा येथे एका विवाह सोहळ्याप्रसंगी शुभांगी पाटील या गेल्या असता उमेदवार सत्यजित तांबे हे देखील यावेळी समोर आले होते. दोघे समोरून जात असताना शुभांगी पाटील यांनी त्यांना हात जोडले होते. यावर आज शुभांगी पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या, हो मी हात जोडले, आपण सामान्य आहोत, आपल्यासमोर असलेला प्रत्येक व्यक्ती ग्रेट आहेत, म्हणून आपलं हात जोडण आपलं काम आहे, म्हणून मी त्यांना हात जोडला, असं त्या म्हणाल्या. तसेच बाळासाहेब थोरात यांच्या घरी घडलेल्या प्रसंगाबद्दल त्यांनी मत व्यक्त करताना म्हणाल्या की आमचं बोलणं चालू होतं, मला त्या दिवशी सांगितलं होत, मात्र त्या दिवशी भेट होऊ शकली नाही, त्या दिवशी ताई घरी असतील म्हणून भेट घ्यायला गेले होते मात्र भेट होऊ शकली नाही. फोनवर बोलणे झाले होते, लवकरच त्यांची प्रत्यक्ष भेट आणि आशीर्वाद घ्यायला जाणार असल्याचे उमेदवार शुभांगी पाटील यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुभांगी पाटील आज नाशिकमध्ये (Nashik) आल्या होत्या.  तयावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सत्यजित तांबे यांना भाजपने अद्याप पाठिंबा दिलेला नाही, या प्रश्नावर त्या म्हणाल्या कि, तो त्यांचा विषय आहे, त्यांनी काय करावं, आपण नाही बोलू शकत, महाविकास आघाडीने मला आशीर्वाद दिले आहेत, मातोश्रीने पाठिंबा दिला आहे, या ठिकाणी व्यवस्थित सहकार्य मिळते आहे, सर्वजण काम करत असून प्रचार जोरदार सुरू आहे. माझ्या प्रचारार्थ मतदारसंघातील सर्व भाऊ बहीण सोबत आहेत, त्यामुळे मी कुणाशी संपर्क करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. शिवाय शिवसेनेकडून निवडणुकीच्या कामासाठी लोक आले आहेत, मात्र प्रचारासाठी नाही, कार्यकर्ते, पदाधिकारी पहिल्या दिवसांपासून सोबत आहेत. सर्वच शिवसैनिक, पदाधिकारी जोरदारपणे तयारी करत आहेत, त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे, मी थकले आहे, मात्र कार्यकर्ते थकले नाहीत, असंही त्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन त्यांच्या चरणांवर नतमस्तक होते आहे, आज त्यांची जयंती. त्यांना आज अभिवादन करणे महत्वाचे आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतदारा पर्यंत पोहचण्याचे काम करत आहे. शिवसैनिक, महाविकस आघाडी, जनता माझ्यासोबत आहे, गेल्या दहा वर्षात अनेक प्रश्न सोडवले आहेत, अनेक आंदोलने केली आहेत, त्यामूळे काही नसताना एवढे प्रश्न सोडवले आहेत, तर लोक नक्कीच विचार करतील की सदनात पाठवल्यानंतर चार पटीने अनेक कामे मार्गी लागतील. त्यामुळे तुम्हाला दिसत आहे की काम कोण करतंय, कामच माझा प्रचार आहे, त्यामुळे मतदार नक्कीच मला विजयी असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. 

news reels New Reels

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here