वाशिम: पटसंख्या कमी असल्यानं शाळा बंद होत असल्याच्या घटना घडत असताना वाशिममध्ये एक अनोखी शाळा भरते. जिल्हा परिषदेच्या या शाळेत केवळ एक विद्यार्थी आहे. गणेशपूरमधील या शाळेची सध्या संपूर्ण देशात चर्चा आहे. केवळ एका विद्यार्थ्यासाठी ही शाळा चालवली जाते. अनेक जण सरकारी शाळेकडे पाठ फिरवत असताना कार्तिक दररोज वेळेवर शाळेत जातो.

वाशिम जिल्ह्यात असलेल्या गणेशपूर गावची लोकसंख्या १५० ते २०० च्या दरम्यान आहे. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. मात्र शाळेत केवळ एकच विद्यार्थी शिकतो. त्याला शिकवण्यासाठी एक शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत एकच विद्यार्थी असूनही शाळा भरते. कार्तिक शेगोकार असं त्या एकमेव विद्यार्थ्याचं नाव आहे. तो तिसरीत शिकतो. त्याला शिकवण्यासाठी शिक्षक १२ किलोमीटर अंतर कापून शाळा गाठतात. दोघेही शाळेत आल्यावर राष्ट्रगीत म्हणतात. त्यानंतर अभ्यास सुरू होतो.
लुडो खेळताना पाकिस्तानी तरुणी भारतीयाच्या प्रेमात, नेपाळमधून एंट्री; आता प्रेमकहाणीत ट्विस्ट
शाळेत एकच विद्यार्थी आहे. कार्तिकला शिकवण्यासाठी त्याचे गुरुजी दूरवरून दररोज येतात. एकमेव विद्यार्थ्याचं ज्ञानार्जन थांबू नये यासाठी शिक्षक किशोर मानकर नित्यनेमानं शाळेत पोहोचतात. एकच विद्यार्थी असूनही मानकर मोठ्या जोमानं आणि तन्मयतेनं त्यांच काम करतात. संपूर्ण गावात एकमेव शाळा आहे. या शाळेत एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक आहेत.
तीन दिवस एकीसोबत; तीन दिवस दुसरीसोबत; २ बायकांकडून नवऱ्याची वाटणी; रविवारचं काय? फैसला झाला
जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या दोन वर्षांपासून एकच विद्यार्थी असल्याचं किशोर मानकर यांनी सांगितलं. ‘शाळेत कार्तिक नावाचा एकमेव विद्यार्थी आहे. त्याच्याशिवाय इतर कोणीच शाळेत प्रवेश घेतलेला नाही. मात्र यामुळे कार्तिकचं शिक्षण थांबलेलं नाही आणि ते थांबणारही नाही,’ असं मानकर म्हणाले. कार्तिकला मिड डे मीलसोबत सगळ्या सुविधा दिल्या जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here