मुंबई: तुम्ही कधी ना कधी ऑनलाईन फूड डिलिव्हरी ऍपच्या माध्यमातून जेवण मागवलं असेल. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन फूड डिलिव्हरी ऍपना अच्छे दिन आले आहेत. झोमॅटो, स्विगी, ऊबर इट्स ही नावं परिचयाची झाली आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये या ऍप्समुळे खाद्यपदार्थ आपल्या घरापर्यंत पोहोचतात.

झोमॅटोवरून खाद्यपदार्थ मागवताना तुम्ही जास्त पैसे मोजले असं कोणी तुम्हाला सांगितलं तर? तुम्ही ज्या पदार्थांसाठी १०००, १२०० रुपये मोजलेत, तेच पदार्थ तुम्हाला २०० ते ३०० रुपयांपर्यंत विकत घेता आले असते, असं तुम्हाला कळलं तर? झोमॅटो डिलिव्हरी एजंटकडून सुरू असलेला घोटाळा समोर आला आहे.
अक्षयला झोपायला घरी बोलव! नवऱ्याने बायकोला सांगितले; प्रियकर येताच संपवले; २० तुकडे केले
एका व्यक्तीनं झोमॅटो डिलिव्हरी एजंटनं त्याला दिलेली ऑफर लिंक्डइन पोस्टच्या माध्यमातून सांगितली आहे. २००-३०० रुपये द्या आणि जेवणाचा आनंद घ्या, अशा स्वरुपाची ऑफर झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनं दिली. या प्रकाराची आपल्याला कल्पना असून यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपिंदर गोयल यांनी सांगितलं.

विनय सती नावाच्या व्यक्तीनं लिंक्डइन पोस्टच्या माध्यमातून झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयसोबत झालेला संवाद आणि त्यानं दिलेली ऑफर सांगितली आहे. पुढच्या वेळेपासून २०० किंवा ३०० रुपये द्या आणि हजार रुपयांच्या जेवणाचा आनंद घ्या, असं डिलिव्हरी एजंट विनय सती यांना म्हणाला.
तीन दिवस एकीसोबत; तीन दिवस दुसरीसोबत; २ बायकांकडून नवऱ्याची वाटणी; रविवारचं काय? फैसला झाला
‘मला २००, ३०० रुपये द्या आणि १००० रुपयाचं जेवण जेवा. मी झोमॅटोला तुम्ही खाद्यपदार्थांची ऑर्डर न घेतल्याचं सांगेन आणि तुम्ही मागवलेले खाद्यपदार्थदेखील तुम्हाला देईन, अशी ऑफर डिलिव्हरी एजंटनं मला दिली. झोमॅटोसोबत होत असलेला घोटाळा पाहून मला धक्काच बसला,’ असं सती यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here